​पेशवा बाजीराव मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी अनुजा साठेला झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2017 05:27 PM2017-01-05T17:27:07+5:302017-01-05T17:27:07+5:30

बाजीराव मस्तानी या मालिकेत अनुजा साठेने बाजीराव पेशव्यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा यांसारखे ...

Anuja Sathe suffered injuries during filming of Peshwa Bajirao series | ​पेशवा बाजीराव मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी अनुजा साठेला झाली दुखापत

​पेशवा बाजीराव मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी अनुजा साठेला झाली दुखापत

googlenewsNext
जीराव मस्तानी या मालिकेत अनुजा साठेने बाजीराव पेशव्यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा यांसारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात असले तरी अनुजानेदेखील तिची भूमिका खूपच चांगल्याप्रकारे साकारली होती. तिच्या भूमिकेचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. या चित्रपटानंतर बाजीराव पेशवेंच्या आयुष्यावर आता पेशवा बाजीराव ही एक मालिका येणार आहे. 
या मालिकेतही अनुजा साठे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. पण या मालिकेत ती बाजीराव पेशव्यांच्या बहिणीची नव्हे तर त्यांच्या आईची म्हणजेच राधाबाईंची भूमिका साकारणार आहे. या मालिकेचे सध्या जोरात चित्रीकरण सुरू आहे. या मालिकेचे चित्रीकरण करत असताना नुकताच एक छोटासा अपघात झाला आणि त्यात अनुजाला दुखापत झाली. अनुजा ही एक खूप चांगली अभिनेत्री असून प्रत्येक गोष्ट परफेक्ट झाली पाहिजे असा तिचा हट्ट असतो. तसेच तिला विविध आव्हाने पेलायला खूप आवडतात. पेशवा बाजीराव या मालिकेत राधाबाई घोडस्वारी करत आहेत असे एका दृश्यात दाखवायचे होते. त्या दृश्यासाठी बॉडी डबल न वापरता अनुजाने स्वतः घोडेस्वारी करण्याचे ठरवले. तिने घोडेस्वारी खूपच चांगल्याप्रकारे केली आणि ते दृश्य खूपच चांगल्याप्रकारे चित्रीतदेखील होत होते. पण या दृश्याचे चित्रीकरण संपायच्या काही मिनीट अगोदर अनुजा घोड्यावरून जोरात पडली. त्यामुळे तिच्या पायाला आणि कंबरेला प्रचंड दुखापत झाली. पण तरीही त्याही अवस्थेत तिने तिचे चित्रीकरण पूर्ण केले आणि पुन्हा एकदा त्याच ताकदीने अभिनय केला. 

Web Title: Anuja Sathe suffered injuries during filming of Peshwa Bajirao series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.