OMG! जसलीन मथारू-पारस छाब्राला एकत्र पाहून अनुप जलोटांचा होतोय जळफळाट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 03:00 PM2020-02-23T15:00:00+5:302020-02-23T15:00:02+5:30

बातमी वाचून बसेल धक्का...

anup jalota says paras chhabra is not a good guy for jasleen matharu to marry | OMG! जसलीन मथारू-पारस छाब्राला एकत्र पाहून अनुप जलोटांचा होतोय जळफळाट!!

OMG! जसलीन मथारू-पारस छाब्राला एकत्र पाहून अनुप जलोटांचा होतोय जळफळाट!!

googlenewsNext
ठळक मुद्देजसलीनने कशा मुलाशी लग्न करायला हवे? असा प्रश्न केला असताना तिला माझ्यासारखा पार्टनर हवा, असे अनुप जलोटा म्हणाले.

‘बिग बॉस’च्या 12 व्या सीझनमध्ये एका जोडीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ही जोडी होती भजन सम्राट अनुप जलोटाजसलीन मथारू यांची. एकमेकांचे गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्ड म्हणून अनुप जलोटाजसलीन मथारू यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. अर्थात घरातून बाहेर पडल्यानंतर हा सगळा ड्रामा होता हे सिद्ध झाले होते. आता जसलीन मथारू पुन्हा एकदा टीव्हीवरच्या एका शोमुळे चर्चेत आहे. होय, ‘मुझसे शादी करोगे’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती पारस छाब्राला रिझवताना दिसतेय. पण तिला पारसला रिझवताना पाहून अनुप जलोटांचा मात्र जळफळाट होतोय.


स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत अनुप जलोटा जे काही बोलले त्यावरून तरी हेच दिसतेय. ‘पारस जसलीनसाठी चांगला मुलगा आहे, असे मला अजिबात वाटत नाही. पारसने दोन रिअ‍ॅलिटी केले आहेत, त्यामुळे त्याच्यासारख्या मुलासोबत जसलीनने लग्न करावे, अशी माझी इच्छा नाही,’असे अनुप जलोटा म्हणाले.


ते पुढे म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी मला जसलीनचा कॉल आला होता. मुझसे शादी करोगे या शोमध्ये मी काम करतेय, असे तिने मला सांगितले. सध्या मी व जसलीन ‘वो मेरी स्टुडंट है’ या सिनेमात काम करतोय. अशास्थितीत हा शो करणे गरजेचे आहे का? असा प्रश्न मी जसलीनला केला. यावर हो, हा शो माझ्यासाठी खूप मोठी संधी असल्याचे ती मला म्हणाली. या शोद्वारे आपण आपल्या चित्रपटाचेही प्रमोशन करू शकतो, असेही म्हणाली. त्यामुळे मी तिला होकार दिला.’


जसलीनने कशा मुलाशी लग्न करायला हवे? असा प्रश्न केला असताना तिला माझ्यासारखा पार्टनर हवा, असे अनुप जलोटा म्हणाले. मी शांत स्वभावाचा आहे. कामाप्रति फोकस आहे. पत्नीला आदर देणारा, तिला समान वागवणारा आहे. मला संधी मिळाली तर मी शोमध्ये जाऊन पारस तुझ्यासाठी योग्य नाही,हे जसलीनला जरूर सांगेल, असेही अनुप जलोटा म्हणाले.

Web Title: anup jalota says paras chhabra is not a good guy for jasleen matharu to marry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.