'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 09:59 AM2024-08-26T09:59:16+5:302024-08-26T09:59:37+5:30

'अनुपमा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली गांगुली हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रुपालीच्या सासू सुदर्शन वर्मा यांचं निधन झालं आहे.

anupama fame rupali ganguly mother in law death actress shared emotional post | 'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर

'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर

'अनुपमा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली गांगुली हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रुपालीच्या सासू सुदर्शन वर्मा यांचं निधन झालं आहे. सोशल मीडियावरुन अभिनेत्रीने ही दु:खद बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. सासूच्या निधनाने रुपालीच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रुपालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे. 

या व्हिडिओतून रुपालीने सासू आणि तिच्या मुलामध्ये असलेलं बॉण्डिंग दाखवलं आहे. आजी आणि नातवाचा हा भावुक व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. रुपालीच्या सासू या व्हिडिओत नातू रुद्रांशला आशीर्वाद देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत रुपाली म्हणते, "रुद्रांशचा हा पहिला वाढदिवस असेल जो त्याच्यावर आईवडिलांपेक्षाही जास्त प्रेम करणाऱ्या व्यक्तीशिवाय होणार आहे. आजीचा लाडका कृष्णा...तुमची जागा कोणीही भरुन काढू शकत नाही". रुपालीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. 


दरम्यान, रुपाली गांगुली हा हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लाडका चेहरा आहे. कसौटी जिंदगी की, कहानी घर घर की, परवरीश, संजिवनी, बा बहू और बेबी अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. साराभाई वर्सेस साराभाई या शोमधील भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. रुपालीने २०१३ मध्ये बिजनेसमॅन अश्विन वर्मा यांच्यासोबत लग्न करत संसार थाटला. लग्नानंतर काही महिन्यांतच रुपालीने तिच्या मुलाला जन्म दिला. तिच्या लेकाचं नाव रुद्रांश असं आहे. 

Web Title: anupama fame rupali ganguly mother in law death actress shared emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.