सावत्र लेकीच्या आरोपांवर पहिल्यांदाच बोलली रुपाली गांगुली; म्हणाली, "नक्कीच परिणाम झाला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 11:07 IST2024-12-10T11:06:32+5:302024-12-10T11:07:26+5:30
रुपाली गांगुली या विषयावर पहिल्यांदाच व्यक्त झाली.

सावत्र लेकीच्या आरोपांवर पहिल्यांदाच बोलली रुपाली गांगुली; म्हणाली, "नक्कीच परिणाम झाला..."
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सावत्र लेकीने तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर रुपालीने तिच्यावर ५० कोटींचा मानहानीचा दावाही दाखल केला. या सगळ्या प्रकरणात नुकतंच रुपालीला प्रश्न विचारला असता तिने यावर मौन सोडलं आहे.
इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत रुपाली गांगुली म्हणाली, "या सगळ्याचा माझ्यावर परिणाम होत नाही असं मी म्हणाले तर ते खोटं ठरेल. नक्कीच परिणाम होतो. आपण माणूस आहोत, जर आपल्या पाठीमागेही कोणी आपल्याबद्दल काही बोललं तर आपल्याला वाईट वाटतं. जे लोक माझ्यावर प्रेम करतात ते यापुढेही करत राहतील. तुम्ही चांगले कर्म करत राहा, आज नाहीतर उद्या तुमच्यासोबत चांगल्या गोष्टी होतील. वाईट वेळ कधीकधी येते. वाईट गोष्टी घडतात. पण शेवटी नेहमीच सत्याचा विजय होतो."
नेमकं प्रकरण काय?
रुपाली गांगुलीच्या सावत्र मुलीचं नाव ईशा आहे. ईशा तिच्या आईसोबत राहते. तर तिच्या वडिलांनी अश्विन वर्मा यांनी रुपाली गांगुलीसोबत दुसरं लग्न केलं. त्यांना एक मुलगाही आहे. रुपालीने आपल्या आईला कसा त्रास दिला, वडिलांना कसं जाळ्यात ओढलं असे आरोप ईशाने लावले. रुपाली लग्नाआधीच प्रेग्नंट होती असाही खुलासा तिने केला. यानंतर रुपालीने ईशावर ५० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला. रुपालीने उचललेल्या या पावलानंतर ईशाने तिचं सोशल मीडियावर अकाऊंटच डिलिट केलं होतं.