अनुपमाला पडली मराठमोळ्या सणाची भुरळ; रुपाली गांगुलीला खेळायचेत मंगळागौरीचे खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 06:00 AM2022-08-11T06:00:00+5:302022-08-11T06:00:00+5:30

Rupali ganguly: गौरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या मंगळागौरीचे खेळ खेळत आहेत. हा खेळ पाहून अनेक सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट केली. मात्र, अनुपमा फेम रुपाली गांगुलीची कमेंट चर्चेत आली.

Anupama fell in love with the Marathmola festival Rupali Ganguly wants to play mangalagauri | अनुपमाला पडली मराठमोळ्या सणाची भुरळ; रुपाली गांगुलीला खेळायचेत मंगळागौरीचे खेळ

अनुपमाला पडली मराठमोळ्या सणाची भुरळ; रुपाली गांगुलीला खेळायचेत मंगळागौरीचे खेळ

googlenewsNext

सध्याच्या घडीला रुपाली गांगुली (rupali ganguly) हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. अनुपमा या मालिकेच्या माध्यमातून रुपालीने विशेष लोकप्रियता मिळवली आहे. विशेष म्हणजे हिंदी मालिकांमध्ये वावर असलेल्या रुपालीचा मराठी कलाविश्वाशीदेखील जवळचा संबंध असल्याचं पाहायला मिळतो. त्यामुळेच अलिकडेच तिने मंगळागौरीचे खेळ खेळायची इच्छा व्यक्त केली आहे.

अलिकडेच 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजना आणि अनघा यांची पहिली मंगळागौर पार पडली. अगदी पारंपरिक पद्धतीने या मालिकेत मंगळागौर साजरी करण्यात आली. यातलाच एक व्हिडीओ गौरी कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून रुपाली गांगुलीने त्यावर कमेंट करत हे खेळ खेळायची इच्छा असल्याचं म्हटलं.

गौरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या मंगळागौरीचे खेळ खेळत आहेत. हा खेळ पाहून अनेक सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट केली. मात्र, अनुपमा फेम रुपाली गांगुलीची कमेंट चर्चेत आली. रुपालीने चक्क मराठीमध्ये कमेंट करत मला हा खेळ खेळायचा आहे असं म्हंटलं आहे.

दरम्यान, अनुपमा बंगाली मालिका 'श्रीमोई'चा रिमेक आहे. तर, 'आई कुठे काय करते' हे या मालिकेचं मराठी व्हर्जन आहे. अनुपमाने म्हणजेच रुपाली गांगुलीने काही दिवसांपूर्वीच आई कुठे काय करतेच्या टीमची भेट घेतली होती. या भेटीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 
 

Web Title: Anupama fell in love with the Marathmola festival Rupali Ganguly wants to play mangalagauri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.