SEE PICS : अध्यात्माच्या मार्गाला लागलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं बदललं रूप, ओळखणंही कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 18:25 IST2022-04-26T18:24:45+5:302022-04-26T18:25:09+5:30
Anagha Bhosale :‘अनुपमा’मधील नंदिनी अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अनघा भोसले हिने अचानक ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि पाठोपाठ ग्लॅमर इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला. याच अनघाचे ताजे फोटो सध्या व्हायरल होत आहेत

SEE PICS : अध्यात्माच्या मार्गाला लागलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं बदललं रूप, ओळखणंही कठीण
टीव्हीची नंबर 1 हिंदी मालिका ‘अनुपमा’मधील (Anupamaa) नंदिनी अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अनघा भोसले (Anagha Bhosale) हिने अचानक ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि पाठोपाठ ग्लॅमर इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला. अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी मी हा निर्णय घेत असल्याचं तिनं जाहिर केलं होतं. याच अनघाचे ताजे फोटो सध्या व्हायरल होत आहेत आणि ते पाहून चाहते थक्क झाले आहेत. या फोटोत अनघाला ओळखंणही कठीण झालं आहे. तिचा लुक पूर्णपणे बदलला आहे.
या फोटोत अनघा साडीत दिसतेय. गळ्यातील कापडी पिशवीमध्ये जपमाळ, माथ्यावर टिळा असा तिचा लुक आहे.
अनघाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत अॅक्टिंग सोडत असल्याच्या निर्णयाची माहिती दिली होती.‘ मी अधिकृतपणे चित्रपट आणि टीव्ही क्षेत्राला रामराम केला आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या या निर्णयाचा आदर करावा आणि मला पाठिंबा द्यावा अशी माझी इच्छा आहे. अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी मी हा निर्णय घेत आहे. आपण सर्व देवाची मुले आहोत यावर माझा विश्वास आहे. आपल्या सर्वांची इच्छा एकच आहे, पण फक्त आपले मार्ग वेगळे आहेत. देव माज्यासाठी नेहमीच दयाळू होता. ज्या उद्देशाने आपण सर्वजण या जीवनात आलो आहोत तो उद्देश पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे.’ असं अनघाने तिच्या या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
त्याआधी एका मुलाखतीत अनघा ग्लॅमर इंडस्ट्रीतील ढोंगीपणावर बोलली होती. ‘इंडस्ट्रीतील ढोंगीपणामुळे मी त्रस्त झाले असून या इंडस्ट्रीत पुढे काम करण्याची इच्छा नसल्याचं अनघाने यावेळी स्पष्ट केलं होतं. इंडस्ट्रीतील सर्वच लोक खरे नसतात. इथे प्रत्येक पावलावर दुटप्पी, ढोंगी लोक भेटतात. तुम्ही नसलेली व्यक्ती होण्यासाठी तुमच्यावर सतत दबाव असतो. स्पर्धा इतकी की, सगळेच एकमेकांना तुडवत समोर जाण्याच्या प्रयत्नात दिसतात, असं ती म्हणाली होती.
अनघाने ‘दादी अम्मा... दादी अम्मा मान जाओ’ या टीव्ही मालिकेतील छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. पण तिना खरी ओळख मिळाली ती ‘अनुपमा’ या मालिकेने.