Anupama Spoiler Alert: पुन्हा एकदा अनुपमा होणार आई, अनुज-अनुपमाच्या आयुष्यात होणार अनुची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 02:30 PM2022-05-30T14:30:41+5:302022-05-30T14:31:07+5:30
Anupama Upcoming Episode: ‘अनुपमा’ ही मालिका सध्या एका रंजक वळणावर आली आहे. अनुपमाच्या लग्नानंतर सगळं काही बदललं आहे. एकीकडे अनुपमाचा नवा संसार सुरू झाला आणि दुसरीकडे वनराज व काव्याचं नातं तुटण्याच्या मार्गावर आहे.
Anupama Upcoming Episode: ‘अनुपमा’ (Anupama ) ही मालिका सध्या एका रंजक वळणावर आली आहे. अनुपमाच्या लग्नानंतर सगळं काही बदललं आहे. एकीकडे अनुपमाचा नवा संसार सुरू झाला आणि दुसरीकडे वनराज व काव्याचं नातं तुटण्याच्या मार्गावर आहे. ‘अनुपमा’मध्ये आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की, लग्नानंतर अनुपमा व अनुज आयुष्याचा प्रत्येक क्षण एन्जॉय करत आहेत. दोघंही हनीमूनवर जाण्याचा निर्णय घेतात. तिकडे काव्या वनराजपासून वेगळं होण्याचा निर्णय घेते.
अनुज व अनुपमा हनिमुनसाठी मुंबईला जातात. मुंबईत दोघांचाही रोमान्स चांगलाच बहरतो. अनुपमाच्या हनिमुनचे फोटो पाहून मुलं आणि बापूजींना आनंद होतो. याऊलट वनराजचा मूड बिघडतो. अनुज व अनुपमा सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जातात. हाजी अलीचं दर्शन घेतात. अनुपमा अनुजला त्याच्यासाठी स्पेशल असलेल्या जागी नेण्याचा हट्ट करते आणि तिचा हट्ट पुरवत अनुज अनुपमाला अनाथ आश्रमात घेऊन जातो. याच अनाथ आश्रमात अनुज लहानाचा मोठा झाला असतो. आई-वडिल नसल्याचा, अनाथ असल्याचं दु:ख-वेदना तो अनुपमाजवळ बोलून दाखवतो. मी या अनाथ आश्रमालाच मंदिर मानलं आहे, असं अनुज म्हणतो आणि त्याला भावुक झालेलं बघून अनुपमाला अश्रू अनावर होतात.
अनुज व अनुपमाच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री
अनाथ आश्रमात अनुज व अनुपमा एका चिमुकल्या मुलीला भेटतील. अनु नावाच्या या मुलीला भेटून अनुपमा पुन्हा एकदा भावुक होईल. या चिमुकल्या अनुला दत्तक घेण्याचा निर्णय अनुज व अनुपमा घेतील. या मुलीसोबत आपलं एक गहिरं नातं आहे, हे मात्र तोपर्यंत तिला कळणार नाही. अनुला दत्तक घेतल्यानंतर अनुपमा व अनुज तिचे आई-बाबा होतील.
काव्या करणार नवा बिझनेस
काव्या तिचा एक्स बॉयफ्रेन्ड अनिरूद्धसोबत मिळून मार्केटींग एजन्सी सुरू करेल. अनिरूद्ध मोठा माणूस झाला आहे आणि आता तो माझ्या स्टार्टअपमध्ये पैसा इनव्हेस्ट करणार असल्याचं ती सांगेल. यावरून काव्या व वनराज यांच्यात वाद होईल. पण कदाचित काव्या काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. मी तुझं ऐकायला अनुपमा नाही, असं म्हणत ती रागारागात निघून जाईल. आई काव्याला समजावू शकते, असं पाखी म्हणेल. पण अनुपमाला आता अधिक त्रास द्यायचा नाही, असं म्हणत बा याला विरोध करेल.