‘सूर नवा ध्यास नवा'चा राजगायक ठरला अनिरुध्द जोशी !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 04:26 AM2018-04-09T04:26:00+5:302018-04-09T09:56:00+5:30

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सेलेब्रिटी गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने ...

Anurad Joshi was the new governor of 'Sur New Laxman Nava' | ‘सूर नवा ध्यास नवा'चा राजगायक ठरला अनिरुध्द जोशी !

‘सूर नवा ध्यास नवा'चा राजगायक ठरला अनिरुध्द जोशी !

googlenewsNext
र्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सेलेब्रिटी गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. १५ स्पर्धकांबरोबर सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले आणि याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम पाच शिलेदार शरयू दाते, प्रेसेनजीत कोसंबी, निहिरा जोशी देशपांडे, अनिरुध्द जोशी आणि विश्वजित बोरवणकर. या स्पर्धकांमध्ये रंगला सूर नवा ध्यास नवाचा महाअंतिम सोहळा. महाअंतिम सोहळ्यामध्ये रंगली गाण्याची मैफल आणि रंगले संगीत युध्द विजेतेपद जिंकण्यासाठीचे... आणि या मधूनच महाराष्ट्राला मिळाला नवीन सूर... महाराष्ट्राचे भावगंधर्व – संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सचिन पिळगावकर यांच्या हस्ते सूर नवा ध्यास नवाच्या विजेत्याच नाव घोषित करण्यात आले. अनिरुध्द जोशी याने सूर नवा ध्यास नवाचा  राजगायक होण्याचा मान पटकावला. अनिरुध्द जोशीला कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये, मानाची कटयार मिळाली तसेच केसरी टूअर्स तर्फे ऑस्ट्रेलीयचा दौरा तर निहिरा जोशी, प्रेसेनजीत कोसंबी, शरयू दाते आणि विश्वजित बोरवणकर या उपविजेत्यांना पंचाहत्तर हजार रुपयांचा धनादेश मिळाला. तेंव्हा बघायला विसरू नका “सूर नवा ध्यास नवा” कार्यक्रमाचा दमदार महाअंतिम सोहळा ८ एप्रिल रोजी संध्या ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.  

“सूर नवा ध्यास नवा” कार्यक्रमामध्ये प्रेसेनजीतचा शाही बाज, निहीराचा गोड आवाज, अनिरुध्दचे नाट्यसंगीत आणि शरयूचे कुठलेही गाणे सहज गाण्याची कला यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमामधील एका पेक्षा एक सुरेल स्पर्धकांना मागे टाकत या पाच स्पर्धकांनी अंतिम फेरीमध्ये जाण्याचा मान मिळवला. महाअंतिम सोहळ्यामध्ये शाल्मली खोलघडे, अवधूत गुप्ते आणि महेश काळे यांनी त्यांच्या दमदार गाण्यांनी स्पर्धक आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अवधूत गुप्ते यांनी R.D. बर्मन यांची सुप्रसिध्द गाणी सादर करून त्यांना आदरांजली दिली तर महेश काळे यांनी हे सुरांना चंद्रा व्हा आणि अरुणी किरणी ही गाणी गाऊन उपस्थितांना पुन्हाएकदा भारावून टाकले. शाल्मली खोलघडे हिने देखील तिच्या दमदार गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवली. तसेच प्रत्येक कॅप्टनसने त्यांच्या स्पर्धकांबरोबर सुंदर गाणी म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले.  

ईतकेच नव्हे, कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी कलर्स मराठीच्या परिवारातील प्रेक्षकांचे लाडके कलाकार उपस्थित होते. राधा प्रेम रंगी रंगली, घाडगे & सून तसेच सरस्वती मालिकेमधील कलाकारांनी महाअंतिम सोहळ्यामध्ये हजेरी लावली. तसेच व्हायाकॉम18 मोशन पिक्चर्सचा आगामी चित्रपट सायकलची टीम - प्रियदर्शन जाधव, हृषीकेश जोशी आणि मैथिली पटवर्धन हे देखील महाअंतिम सोहळ्यास हजर होते. प्रियदर्शन जाधव, हृषीकेश जोशी यांनी एक धम्माल स्कीट देखील साजर केले. तसेच रणांगण चित्रपटाची टीम स्वप्नील जोशी, सचिन पिळगावकर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग उपस्थित होते.  

राजगायक होण्याचा मान पटकावल्यानंतर अनिरुध्द जोशी म्हणाला, “ सूर नवा ध्यास नवा आणि कलर्स मराठीचे खूप आभार त्यांनी या प्रकारचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आणला ज्यामध्ये त्यांनी सेलिब्रिटी गायकांना स्पर्धक म्हणून आणले. खरं सांगायचं तर या कार्यक्रमामध्ये स्वत:शीच स्पर्धा होते असे मी म्हणेन. कारण खूपच अप्रतिम स्पर्धक माझायासोबत होते, जिंकण सोपं अजिबात नव्हतं. परंतु या कार्यक्रमामुळे मला हे कळलं कि, मी वेगळ्या प्रकारची गाणी गाऊ शकतो, ही संधी मला याच मंचाने दिली. राजगायक हा मान मिळाल्यानंतर आणि सूर नवा हा कार्यक्रम जिंकल्यावर मला नवीन गाणी, गाण्यामध्ये नवनवे प्रयोग करण्याची इच्छा आहे. या कार्यक्रमाने ज्या गोष्टी शिकविल्या त्यांचा आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी देखील नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं”.

Web Title: Anurad Joshi was the new governor of 'Sur New Laxman Nava'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.