अनुराग बसूला लागले ह्या गोष्टीचे वेड, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 08:40 PM2019-01-24T20:40:00+5:302019-01-24T20:40:00+5:30

आपण सर्व जण अनुराग बसूला एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळखतो पण या प्रतिभावंताला मोकळ्या वेळेत स्केच काढायलाही खूप आवडते.

Anurag Basu has passion of this thing | अनुराग बसूला लागले ह्या गोष्टीचे वेड, जाणून घ्या याबद्दल

अनुराग बसूला लागले ह्या गोष्टीचे वेड, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext
ठळक मुद्दे अनुराग बसू सर्व स्पर्धकांचा लाडका अनुरागला कॅनव्हासवर तसेच आपल्या फोनवर स्केच करायला आवडते

तुम्ही तुमच्या कामात कितीही अडकलेले असलात, तरी तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचे खरखुरे वेड असेल, तर त्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ काढता. आपण सर्व जण अनुराग बसूला एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळखतो पण या प्रतिभावंताला मोकळ्या वेळेत स्केच काढायलाही खूप आवडते. त्याला आवडणार्‍या अनेक गोष्टींपैकी स्केचिंग ही एक गोष्ट आहे आणि वेळ मिळेल तेव्हा आपली ही आवड जोपासायला त्याला आवडते. तो सर्जनशील असल्यामुळे त्याला स्केचेस काढायला आवडते आणि आपली ही आवड तो जोपासतो. अनुरागला कॅनव्हासवर तसेच आपल्या फोनवर स्केच करायला आवडते.
 
सध्या सुपर डान्सर 3 मध्ये एक परीक्षक म्हणून काम पाहणारा अनुराग बसू सर्व स्पर्धकांचा लाडका आहे. तो नेहमी हलक्या फुलक्या मूडमध्ये असतो आणि इतर परीक्षक आणि स्पर्धक यांच्याशी गप्पा मारत असतो. पण जेव्हा शूटिंगच्यामध्ये त्याला वेळ मिळतो, तेव्हा तो आपल्या सेल फोनवर स्केच करतो.
 आपल्या या स्केचिंगच्या आवडीबद्दल बोलताना अनुराग बसू म्हणाला, ‘असे पुष्कळ क्षण असतात, जेव्हा तुम्हाला काहीही काम नसते. तुम्ही लायटिंगची किंवा स्पर्धकांची वाट बघत असता. अशा वेळी तुम्ही नुसतेच रिकामे बसून राहू शकत नाही. दोन चित्रपटांच्यामध्ये मी विश्रांती घेतो, तेव्हा मी कॅनव्हासवर चित्र काढतो. मी प्रामुख्याने विमानात आणि या शोमध्ये स्केचिंग करतो. स्केचिंग ही माझी खूप आवडती गोष्ट आहे.”
 सुपर डान्सर चॅप्टर 3 शो या शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळेल.

Web Title: Anurag Basu has passion of this thing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.