अनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 08:00 IST2018-09-20T19:18:39+5:302018-09-22T08:00:00+5:30

झी टीव्हीवरील 'इंडियाज्‌ बेस्ट ड्रामेबाझ' या रिएलिटी शोच्या मंचावर अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा त्यांचा आगामी चित्रपट 'सुई-धागा'च्या प्रमोशनसाठी हजेरी लावणार आहेत.

Anushka Sharma learned to make chapatti for this movie | अनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला

अनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला

ठळक मुद्देअनुष्का शर्मा व वरूण धवनने 'इंडियाज्‌ बेस्ट ड्रामेबाझ'च्या मुलांसोबत केली धमाल

झी टीव्हीवरील 'इंडियाज्‌ बेस्ट ड्रामेबाझ' या रिएलिटी शोच्या मंचावर अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा त्यांचा आगामी चित्रपट 'सुई-धागा'च्या प्रमोशनसाठी हजेरी लावणार आहेत. यावेळी वरूण आणि अनुष्काने स्पर्धकांच्या परफॉर्मन्सेसचा आनंद तर घेतलाच पण त्याचसोबत काही गुपितेसुद्धा उघड केली.

हर्ष राज लकी आणि दिपाली बोरकर यांच्यातील प्रणयी विनोदी अॅक्टनंतर अनुष्का आणि वरूण यांना मंचावर बोलावण्यात आले आणि त्यांना त्यांच्या आगामी चित्रपटाच्या संकल्पनेनुसार बेलन, लोटा, लुंगी, स्वेटर, लंगोट अशा मेड इन इंडिया गोष्टी विकायला सांगण्यात आले. अनुष्काने या सगळ्‌या गोष्टी परीक्षक ओमंग कुमार, विवेक ओबेरॉय आणि शांतनु महेश्वरीला विकल्याच नाहीत तर स्वतःबद्दल एक गुपितही सांगितले. अनुष्का म्हणाली की, 'मी माझ्या आयुष्यात कधीही चपाती बनवलेली नाही पण सुई धागामध्ये ममताच्या भूमिकेत शिरण्यासाठी मी चपात्या बनवण्याचा सराव केला. ब्रेकमध्ये मी पोळपाट लाटणे घेऊन बसायचे आणि चपाती बनवण्याचा सराव करायचे. काही वेळा सेटवरील लोक मला सांगायचे की तू दृश्यासाठी चपाती का बनवत नाही आणि मग मी खरोखरच त्या बनवत असे.' हे आव्हान पूर्ण केल्यानंतर परीक्षक, सूत्रधार आणि मुलांनीही अनुष्का आणि वरूण यांच्याकडून ‘बढिया’ हे गाणे शिकले.
अनुष्का शर्मा आणि वरूण धवन या शोमधील मुलांसोबत खूप धमाल करताना दिसणार आहेत आणि या लिटल ड्रामेबाजांसोबत मस्त गप्पाही मारतील. हा स्पेशल एपिसोड २३ सप्टेंबर रात्री रात्री नऊ वाजता झी टिव्हीवर पाहता येणार आहे.
 

Web Title: Anushka Sharma learned to make chapatti for this movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.