तुम्ही हिला ओळखलंत का ? 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटू होती टाईमपास सिनेमात प्राजूची मैत्रीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 13:20 IST2021-12-30T13:12:48+5:302021-12-30T13:20:19+5:30
झी मराठीवर 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Me Nandayla) ही मालिका फार गाजते आहे. या मालिकेतील नायिका स्वीटूने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

तुम्ही हिला ओळखलंत का ? 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटू होती टाईमपास सिनेमात प्राजूची मैत्रीण
सध्या झी मराठीवर 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Me Nandayla) ही मालिका फार गाजते आहे. या मालिकेतील नायिका स्वीटूने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनेक अडचणींवर मात करत स्वीटू आता खानविलकरांची सून झाली आहे. ओम आणि स्वीटूच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
या मालिकेत अन्विता (Anvita Phaltankar)ने स्वीटू ही भूमिका साकारली असून कमी कालावधीत तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज अन्विताचा खूप मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं. कलाविश्वाप्रमाणेच अन्विता सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असून अनेकदा ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. अन्विताला अभिनयासोबतच डान्सचीही विशेष आवड आहे.चार वर्षांची असताना भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती.
पण तुम्हाला माहिती आहे का स्वीटू याआधीही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.रवी जाधव दिग्दर्शिक 'टाईमपास'मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती. यानंतर 2019मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्वितान 'रुमी'च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे.मात्र, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या माध्यमातून ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली.