'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतली स्वीटू जुन्या आठवणीत दंग, 'टाईमपास' सिनेमाची आठवण केली शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 08:00 AM2021-07-18T08:00:00+5:302021-07-18T08:00:00+5:30
अन्विता फलटणकरने छोट्या पडद्यावर मुख्य अभिनेत्री म्हणून झळकत आहे. तिच्या अभिनयामुळेच तिने आज स्वतःला सिद्ध केले आहे. म्हणून अन्विताही रसिकांची आवडती अभिनेत्री बनली आहे.
अभिनेत्री अन्विता फलटणकर 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेमुळे प्रचंड चर्चेत आहे. मालिकेत तीन साकारलेली स्वीटू रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. अन्विता प्रमाणे इतरही भूमिकांनी रसिकांची पसंती मिळवली आहे. अन्विता म्हणजेच स्वीटू सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि ती नेहमी येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील धमाल मस्तीचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. याशिवाय ती नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते. मात्र नुकताच अन्विताने तिचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत केतकी माटेंगावकरही दिसत आहे.
अन्विताने शेअर केलेल्या या फोटोला पसंती मिळत असून त्यावर तिचे चाहते कमेंट्स करत आहेत. अन्विताचा हा फोटो तसा खासच आहे. कारण हा फोटो 'टाईमपास' सिनेमाच्या शूटदरम्यानचा आहे.हा फोटो शेअर करत अन्विताने पुन्हा एकदा सिनेमाच्या दरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला आहे.या फोटोमध्ये अन्विता खूप वेगळी दिसत आहे.हा सिनेमा रसिकांसह समीक्षकांनाही भावला. मराठीत सर्वात जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला होता टाईमपास सिनेमात अन्विताने केतकी माटेंगावरकरच्या मैत्रीणीची म्हणजेच चंदाची भूमिका साकारली होती.सिनेमात छोटीशी भूमिका तिने साकारली असली तरी लक्षवेधी ठरली होती. या सिनेमानंतर 'गर्ल्स' या सिनेमातही ती झळकली आहे.
आज अन्विता छोट्या पडद्यावर मुख्य अभिनेत्री म्हणून झळकत आहे. तिच्या अभिनयामुळेच तिने आज स्वतःला सिद्ध केले आहे. म्हणून अन्विताही रसिकांची आवडती अभिनेत्री बनली आहे. अन्विता भूमिका साकारत असलेली 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेने अल्पावधीतच तुफान लोकप्रियता मिळवली होती.मालिकेतील ओम आणि स्विटू ही जोडी सुपरहीट ठरत आहे.
मालिकेत सध्या दोघांचा लव्हस्टोरी दाखवण्यात येत आहे. या हटके लव्हस्टोरी आणि जोडीलाही रसिकांची भरभरुन पंसती मिळत आहेत. मालिकेत दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट आणि रंक घडामोडींमुळे रसिकही मालिकेला खिळून आहेत.