'पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा',इंडियन आयडलची स्पर्धक सायलीच्या पालकांनाच करायला लावल्या नको त्या गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 18:35 IST2021-05-21T18:35:04+5:302021-05-21T18:35:57+5:30
इंडियन आयडल कार्यक्रमाची टीआरपी वाढवण्यासाठी आयडीयाच्या कल्पना लढवत शो कसा रंजक बनवता येईल यावर मेहनत घेतली जात आहे.

'पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा',इंडियन आयडलची स्पर्धक सायलीच्या पालकांनाच करायला लावल्या नको त्या गोष्टी
गेल्या काही दिवसांपासून रिएलिटी शो इंडियन आयडल हा शो वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोव-यात सापडला आहे. वेगवेगळे गोष्टी दाखवत रसिकांचे लक्ष वेधून घेण्याचा शोचा मेकर्सचा प्रयत्न आहे. त्यामुळे टीआरपी रेटींगमध्ये शो आता ५ व्या स्थानावार पोहचला आहे. आगामी भागात आता आणखी काही गोष्टी दाखवण्याचा घाट निर्मांत्यांनी घातला आहे. यावेळी स्पर्धकांच्या पालकांनाच ऑनस्क्रीन ड्राम करायला सांगितला जाणार आहे.
नुकताच शोचा आगामी भागाचा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोत दाखवल्याप्रमाणे शोची स्पर्धक सायली कांबळेच्या पालकांचा रोमान्स दाखवण्यात येणार आहे. खास या भागासाठी गायक कुमार सोनू आणि अनुराधा पौडवाल हजेरी लावणार आहेत. कुमार सानू सायलीच्या पालकांना दोघांमध्ये सगळ्यात जास्त रोमँटीक कोण असे विचारताना दिसत आहेत. तसेच सायलीच्या आईलाही कधी डेटवर नेले आहे की नाही असाही प्रश्न विचारत आहेत.
शोमध्ये दोघांची ऑनस्क्रीन डेट घडवली जाणार आहे. कँडल लाईट डिनर एन्जॉय करताना सायलीचे पालक दिसणार आहेत. रोमँटीक वातावरणात त्यांच्यासाठी कुमार सानू खास गाणे गाणार आहेत 'मेरा दिल भी कितना पागल है....' या गाण्यावर हे कपल रोमान्स करणार आहेत.
कार्यक्रमाची टीआरपी वाढवण्यासाठी आयडीयाच्या कल्पना लढवत शो कसा रंजक बनवता येईल यावर मेहनत घेतली जात आहे. इतकेच काय तर कार्यक्रमाचा टीआरपी वाढवण्यासाठी नेहा कक्कर पुन्हा लग्न केल्याचेही दाखवण्यात आले होते. अर्थात हे सगळे शोच्या प्रमोशनसाठी सुरु होते हे आधीच रसिकांनाही कळून चुकले होते.
गायक अभिजीत सावंतने 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,' जर तुम्ही प्रादेशिक रिअॅलिटी शो बघला तर प्रेक्षकांना स्पर्धकांच्या बँकग्राऊंडबाबत कदाचित काहीच माहिती नसते.तिथले लोक फक्त गाण्यावरच लक्ष केंद्रित करतात, पण हिंदी रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकांच्या दुःखद कहाण्यांची पूर्तता केली जाते. केवळ त्याच्यावरच लक्ष केंद्रित केले जाते.