'आपण यांना पाहिलंत का?' विजय केंकरे यांचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 05:22 PM2023-09-20T17:22:49+5:302023-09-20T17:23:52+5:30

Vijay kenkare: अनेक नाटकांचं यशस्वी दिग्दर्शन केल्यानंतर आता त्यांचं 'आपण यांना पाहिलंत का?' हे नवं खुसखुशीत नाटक रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालं आहे.

apan yana pahilat ka Vijay Kenkare's new play will soon hit the audience | 'आपण यांना पाहिलंत का?' विजय केंकरे यांचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'आपण यांना पाहिलंत का?' विजय केंकरे यांचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext

ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दिग्दर्शनाची शंभरी पार केली आहे. विशेष म्हणजे त्यांचं प्रत्येक नाटक विशेष  गाजलं आहे. त्यामुळे अनेक नाटकांचं यशस्वी दिग्दर्शन केल्यानंतर आता त्यांचं 'आपण यांना पाहिलंत का?' हे नवं खुसखुशीत नाटक रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालं आहे. हे नाटक येत्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वैवाहिक आयुष्याची बरीच वर्षे सोबत काढल्यावर नवरा बायको  नकळतपणे एकमेकांना ग्राह्य धरू लागतात.  ते सुखी तर असतात, पण त्यांच्या संसारात पोकळी नेहमी जाणवत राहत असते, ती पोकळी कोणी एक व्यक्ती भरून काढतं, ती व्यक्ती त्या जोडप्यांच्या संसारात कधी कधी दिसते, तर कधी नाही दिसत, पण त्यां व्यक्तीच्या असण्याने जो संसार कंटाळवाणा झालाले आहे तो अचनाकपणे ताजातवाना होतो. त्याच्या येण्याने जी काही गंमत संसारात होऊ शकते ती सर्व गंमत 'आपण यांना पाहिलंत का?' या नाटकामध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

विजय केंकरे यांनी पती-पत्नीच्या नात्याचा वेध घेणारी अनेक नाटकं दिग्दर्शित केली आहेत. कसदार दिग्दर्शनातून नेमक्या पद्धतीनं आजच्या काळावर ते नाटकातून भाष्य करतात. त्यातच पती-पत्नी, नातेसंबंध हा विषय प्रत्येक काळात कालसुसंगत असतो. त्यामुळे 'आपण यांना पाहिलंत का?' या नाटकात आता काय धमाल अनुभवायला मिळणार याची उत्सुकता आहे.  
दरम्यान, या नाटकाची निर्मिती आदिती देवेंद्र राव, वैशाली धनेश पोतदार यांनी केली आहे. सुशील स्वामी यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. 

Web Title: apan yana pahilat ka Vijay Kenkare's new play will soon hit the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.