अर्जुन-आर्याच्या साखरपुड्यात अपर्णा होणार सहभागी?; सिंबाला कळणार वडिलांचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 04:44 PM2024-05-30T16:44:43+5:302024-05-30T16:45:10+5:30
Aappi amchi collector: अर्जुन-आर्यासोबत साखरपुडा करत असतांनाच या मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे.
अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत सध्या चांगलंच रंजक वळण आलं आहे. तब्बल सात वर्षानंतर अप्पी आणि अर्जुन एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत. मात्र, इतक्या वर्षात दोघांची परिस्थिती बरीच बदलली आहे. अप्पीसोबत विभक्त होऊन अर्जुन त्याच्या आयुष्यात पुढे वळणार आहे. त्यामुळे अर्जुन लवकरच आर्यासोबत लग्न करणार आहे. परंतु, यामध्येही एक ट्विस्ट येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच रुपालीने अर्जुन आणि अप्पीला फसवून एकमेकांना घटस्फोटाचे पेपर्स पाठवले आहेत. ज्यामुळे त्यांच्यातील गैरसमज वाढला आहे. यामध्येच बाबांच्या शब्दाखातर तो आर्यासोबत लग्न करायला तयार होतो. त्यामुळेच सध्या मालिकेत अर्जुन आणि आर्या यांचा साखरपुडा संपन्न होत आहे. या साखरपुड्यात सिंबा सुद्धा अपर्णाला घेऊन सहभागी झाला आहे. परंतु, साखरपुड्यात अपर्णा आल्यामुळे पुन्हा नवा ट्विस्ट येणार आहे.
अमोलने त्याच्या बाबांचं चित्र काढलं आहे. त्यामुळे आता तो त्यांचा शोध घेत आहे. यामध्येच साखरपुड्यात अर्जुनला पाहिल्यानंतर हेच आपले बाबा असल्याची खात्री त्याला पटते आणि तो अर्जुन-अप्पीला एकत्र आणण्याचा निश्चय करतो. यामध्येच आर्याच्या आईला अप्पी आणि अर्जुनच्या लग्नाविषयी कळतं आणि ती गोंधळून जाते. सोबतच ती सुद्धा अर्जुनकडून एक वचन घेते.
दरम्यान, एकीकडे साखरपुड्यात अप्पी अर्जुनच्या समोर असते. तर, दुसरीकडे त्याने आर्याच्या आईला तो परत अप्पीशी काहीही संबंध ठेवणार नाही, असं वचन देतो. त्यामुळे आता या मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट येणार आहे. अप्पीला साखरपुड्यात पाहून अर्जुन त्याचा निर्णय बदलेल का? सिंबा त्याचा मुलगा असल्याचं सत्य त्याला समजेल का? या सगळ्याची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.