अभिनयाव्यतिरिक्त या गोष्टींमध्ये रमते जुही परमार,अदा खान,जिज्ञासा सिंह यांचे मन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2017 08:38 AM2017-03-21T08:38:30+5:302017-03-21T14:08:30+5:30

छोट्या पडद्यावरील मालिकांमधून अभिनेत्री रसिकांचं मनोरंजन करतात. अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्रींनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. अभिनयासह आपल्या लाडक्या ...

Apart from acting, the minds of Juhi Parmar, Ada Khan, Jivyasa Singh, Ramesh | अभिनयाव्यतिरिक्त या गोष्टींमध्ये रमते जुही परमार,अदा खान,जिज्ञासा सिंह यांचे मन

अभिनयाव्यतिरिक्त या गोष्टींमध्ये रमते जुही परमार,अदा खान,जिज्ञासा सिंह यांचे मन

googlenewsNext
ong>छोट्या पडद्यावरील मालिकांमधून अभिनेत्री रसिकांचं मनोरंजन करतात. अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्रींनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. अभिनयासह आपल्या लाडक्या अभिनेत्री काय करतात, त्यांची आवडनिवड काय हे जाणून घेण्याची रसिकांमध्ये उत्सुकता असते. मालिकांमध्ये काम करणा-या अभिनेत्री आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेवतात. त्यामुळेच अभिनयासह या अभिनेत्री कोणता ना कोणता छंद जोपासतात. या छंदाच्या माध्यमातूनच अभिनेत्री स्वतःचं मन रमवताना दिसतात. टीव्हीवरील तुमच्या लाडक्या अभिनेत्रींचे मन नेमक्या कोणत्या गोष्टींमध्ये रमते या गोष्टींचा घेतलेला हा आढावा.
 
 
आशका गोराडीया 

 
 
 

'नागिन 2' मालिकेतून आशका आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोंरजन करते. आशका साकारत असलेली व्हॅम्पची भूमिका रसिकांची फेव्हरेट ठरतेय. अभिनयासह इतर गोष्टी करण्यातही ती स्वत:ला बिझी ठेवते. मात्र आशकाला एक आगळावेगळा असा छंद आहे. विमानातून प्रवास करणं हे प्रत्येकाला आवडतं.मात्र आशकाला विमानातून प्रवास करण्यासोबतच ते उडवण्याचा छंद आहे. बाईक, कार चालवण्याची आवड, छंद प्रत्येकाला असतो. मात्र आशकाला बाईक आणि कार नाही तर चक्क विमान उडवण्याची आवड आहे. त्याचे तिनं रितसर प्रशिक्षणसुद्धा घेतलंय. लवकरच याचं तिला लायसन्सदेखील मिळणार आहे.
 
 
रूबिना दलिक


 
 
'शक्ती अस्तित्त्व की एहसास की' मालिकेतील रूबिना दलिकला नृत्याची आवड आहे. पॉप आणि रॉकच्या जमान्यात तिला एरिअल डान्सिंगचे वेड आहे. रूबीना एरिअल डान्सिंगचे वेगवेगळ्या कार्यक्रमात हा डान्सफॉर्म सादर केलाय. तिच्या या एरिअल डान्सिंगमुळे अनेकांनी तिचं कौतुकही केलंय. एरिअल डान्सफॉर्म जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हा डान्स सादर करत असल्याचे तिने म्हटले आहे.
 
 
जुही परमार
 

 
'कर्मफल दाता शनी' या मालिकेतील जुही परमार. छोट्या पडद्यावरील रसिकांचं लाडकं नाव. छोट्या पडद्यावर गाजलेल्या कुमकुम मालिकेतून तिने सात वर्षे रसिकांचे मनोरंजन केले आहे. नंतर मालिकेतून काहीसा ब्रेक घेत जुही  संसारात रमली. आता मोठ्या ब्रेकनंतर ती शनी या मालिकेत झळकत आहे. जुहीलाही  या सगळ्या अभिनेत्रींप्रमाणे एका खास गोष्टींची आवड आहे. ती म्हणजे जुहीला किक बॉक्सिंग करायला आवडते. किक बॉक्सिंगच्या माध्यमातून काही तरी वेगळं केल्याचा आनंद मिळत असल्याचं जुहीला वाटतं.
 
अदा खान
 

 
'शेशा' या भूमिकेतून लोकप्रिय ठरलेली टीव्ही अभिनेत्री अदा खाननेही तिचा आगळावेगळा छंद जोपासला आहे. तिला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडते. शूटिंगमधून ब्रेक घेत ती विविध ठिकाणी मस्त सुट्ट्या एन्जॉय करते. तिच्या सुपरकुल अंदाजातले फोटो ती सोशल मीडियावरही पोस्ट करत असते. भारतातील राजस्थान, केरळ, काश्मीर, गोवा आणि परदेशातील दुबई, सिंगापूर अशा ठिकाणांना भेट देणं, त्या त्या ठिकाणची संस्कृती जाणून घेणे यांत तिला रस असल्याचे तिने सांगितले आहे. 
 
 
जिज्ञासा सिंह
 

 

'थपकी प्यार की' मालिकेतील जिज्ञासा सिंहला पेंटीगची आवड आहे. मालिकेच्या सेवटवर मिळालेल्या वेळेत ती पेंटीग करत असते. भिंतीवर वेगवेगळे चित्र रेखाटणेही तिला आवडते. त्यामुळे तिने तिची रुम स्वतःच्या हाताने रंगवली आहे. पेंटीग केल्यामुळे वेगळी एनर्जी मिळत असल्याचं जिज्ञासानं सांगितलंय. जेव्हा जेव्हा मालिकेच्या शूटिंगच्या कामाचा ताण जाणवतो तेव्हा तेव्हा पेंटीग करत स्वत:च वेळ घालवणे पसंत करत असल्याचे तिने सांगितले.
 

Web Title: Apart from acting, the minds of Juhi Parmar, Ada Khan, Jivyasa Singh, Ramesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.