फोटोतील 'या' अभिनेत्याला ओळखलं का?; 'अप्पी आमची कलेक्टर'मध्ये साकारतोय महत्त्वपूर्ण भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 18:30 IST2023-04-28T18:30:00+5:302023-04-28T18:30:00+5:30
Rohit parshuram: या अभिनेत्याने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.

फोटोतील 'या' अभिनेत्याला ओळखलं का?; 'अप्पी आमची कलेक्टर'मध्ये साकारतोय महत्त्वपूर्ण भूमिका
सध्याच्या काळात सोशल मीडिया प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे दूरवर असलेल्या व्यक्तीशीही सहज संपर्क करता येतो. म्हणूनच, अनेक कलाकार मंडळी इन्स्टाग्राम, फेसबुक यासारख्या सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. यात बऱ्याचदा ते त्यांच्या करिअरमधील, त्यांच्या कॉलेज जीवनातील, शाळेतील फोटो शेअर करत असतात. यामध्येच सध्या 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतील एका अभिनेत्याचा जुना फोटो व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो भंडासूर (bhandasur) या असूराच्या रुपात दिसून येत आहे. त्याचा हा फोटो पाहिल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. इतकंच नाही तर त्याने केलेल्या मेकअपमुळे त्याला ओळखणंही कमालीचं कठीण झालं आहे.
व्हायरल होत असलेला फोटो अभिनेता रोहित परशुराम याचा आहे. रोहित सध्या अप्पी आमची कलेक्ट या मालिकेत अर्जुन ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या रोहितने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला त्याचा हा फोटो २०२० मधला आहे. एका हिंदी मालिकेत त्याने भंडासूराची भूमिका साकारली होती. त्यावेळी त्याने हा गेटअप केला होता.