आरारा खतरनाक! रंग माझा वेगळामधील दीपाच्या 'डुब गई में' गाण्यावरील अदांवर चाहते फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 13:31 IST2022-02-05T13:30:45+5:302022-02-05T13:31:29+5:30
Rang Maza Vegla : दीपा उर्फ रेश्मा शिंदे (Reshma Shinde)च्या इंस्टाग्रामवरील व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

आरारा खतरनाक! रंग माझा वेगळामधील दीपाच्या 'डुब गई में' गाण्यावरील अदांवर चाहते फिदा
टेलिव्हिजनवरील मराठी मालिकांमधील टीआरपीच्या रेसमध्ये गेल्या बऱ्याच आठवड्यांपासून रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिका पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेतील सौंदर्या, ललित, श्वेता, दीपा, कार्तिक, कार्तिकी आणि दीपिका या पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) हिने साकारली आहे. रेश्माच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान रेश्मा शिंदेच्या इंस्टाग्रामवरील व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेत्री रेश्मा शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने पर्पल रंगाची साडी आणि त्यावर पफवाला ब्लाउज परिधान केला आहे. या गेटअपमध्ये ती डुब गई में या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. रेश्मा शिंदे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.
रंग माझा वेगळा मालिकेत दीपाने स्वतःचा कार्तिकी डाएट सर्विस हा व्यवसाय सुरू केला आहे. तिच्या पाठीशी सौंदर्या खंबीरपणे उभी राहिली आहे. तर दुसरीकडे कार्तिक दीपिकाला कायमचा युएसला घेऊन जायचे ठरवतो. मात्र दीपिका त्याला कार्तिकी, आजी आणि आजोबांना सोडून येणार नाही असे सांगते. सौंदर्या देखील तिला न्यायचे नाही असे खडसावून सांगते. त्यामुळे जर दीपिका कार्तिकसोबत युएसला गेली तर पुन्हा एकदा ती कार्तिकीपासून दूर जाईल. त्यामुळे दीपिका आणि कार्तिकीच्या मैत्रीत दुरावा येणार की नाही आणि कार्तिक दीपिका नाही आली तर युएसला जाईल का, हे पुढच्या भागात स्पष्ट होईल.