Video: आरतीचं ताट, बुके अन् हार; Bigg Boss फेम अरबाज पटेलचं असं झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 03:10 PM2024-10-20T15:10:11+5:302024-10-20T15:10:45+5:30

चाहत्यांनी अरबाजची घरापर्यंत काढली रॅली

Arbaaz Patel of Bigg Boss marathi was welcomed at his hometown Chhatrapati Sambhajinagar with | Video: आरतीचं ताट, बुके अन् हार; Bigg Boss फेम अरबाज पटेलचं असं झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत

Video: आरतीचं ताट, बुके अन् हार; Bigg Boss फेम अरबाज पटेलचं असं झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत

बिग बॉस मराठी सीझन ५ (Bigg Boss Marathi Season 5)  मधून प्रसिद्धीझोतात आलेला अरबाज पटेल (Arbaz Patel). अरबाजने त्याच्या लूक्स, बॉडी आणि फिटनेसमुळे सर्वांनाच आकर्षित केलं. तसंच तो प्रत्येक टास्क अप्रतिमरित्या खेळला. त्याची आणि निक्की तांबोळीची जोडी चांगलीच गाजली. खूप कमी जणांना माहित असेल की अरबाज पटेल हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर अरबाज पहिल्यांदा संभाजीनगरला गेला. तिथे त्याचं कसं स्वागत झालं बघा.

6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडला. त्यानंतर १५ दिवसांनी आता अरबाज पटेल त्याच्या गावी परतला आहे. अरबाज छत्रपती संभाजीनगरचा  आहे. काल रात्री तो छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाला. त्याच्या स्वागतासाठी अनेक चाहते आले होते. त्याला बुके देत अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फी घेतले. तसंच काही महिला आरतीचं ताट घेऊन आल्या होत्या. त्याचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. नंतर गाडीतून तो घरी रवाना झाला. रस्त्यावरुन जाताना गाडीच्या रुफमधून तो सर्वांना हाय हॅलो करत जात होता. त्याची छोट्या प्रमाणात रॅली काढण्यात आली. अरबाजने नुकतेच हे व्हिडिओ शेअर केले आहेत.


विशेष म्हणजे अरबाजची लव्हस्टोरी जिच्यासोबत गाजली ती निक्की तांबोळी सुद्धा छत्रपती संभाजीनगरची आहे. निक्की लहान असताना कुटुंबासोबत संभाजीनगरमध्येच राहायची. नंतर त्यांचं कुटुंब डोंबिवलीला शिफ्ट झालं. सध्या अरबाज एकटाच आला असून आता त्याच्या पुढच्या प्रोजेक्ट्सकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Arbaaz Patel of Bigg Boss marathi was welcomed at his hometown Chhatrapati Sambhajinagar with

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.