कमिटेड असूनही लेकाची निक्कीशी जवळीक पटतेय का? अरबाजचे बाबा म्हणाले- 'मलाही हे फेक वाटत असून...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 06:35 PM2024-09-03T18:35:51+5:302024-09-03T18:36:13+5:30

अरबाजच्या बाबांनी नुकत्याच एका मुलाखतीत अरबाज-निक्कीच्या मैत्रीवर त्यांचं मौन सोडलंय (arbaz patel, bigg boss marathi 5)

arbaz patel father arman patel talk about relationship between arbaz patel and nikki tamboli | कमिटेड असूनही लेकाची निक्कीशी जवळीक पटतेय का? अरबाजचे बाबा म्हणाले- 'मलाही हे फेक वाटत असून...'

कमिटेड असूनही लेकाची निक्कीशी जवळीक पटतेय का? अरबाजचे बाबा म्हणाले- 'मलाही हे फेक वाटत असून...'

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये वेगवेगळे नातेसंबंध निर्माण होताना दिसत आहेत. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीची मैत्री चांगलीच चर्चेत राहिली आहे. गेल्या आठवड्यात जो भाऊचा धक्का झाला त्या धक्क्यावर रितेशभाऊंनीही अरबाज-निक्कीला चांगलंच सुनावलं. अखेर अरबाज-निक्कीच्या नातेसंबंधांवर अरबाजचे बाबा अरमान पटेल यांनी स्पष्ट शब्दात त्यांचं मत व्यक्त केलं.

अरबाजचे बाबा एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, "मला वाटतं अरबाजने मैत्री पुढे करायला हवी. त्याने इतक्या मोठ्या शोमध्ये सांगितलंय की तो कमिटेड आहे तर त्याने त्यावर ठाम राहिलं पाहिजे. कारण महाराष्ट्राची जनता हा शो बघतेय. आपली महाराष्ट्राची जनता खूप प्रेमळ आहे. महाराष्ट्राच्या जनतेला लगेच विचित्र वाटतंय. हा मुलगा कमिटेड असूनही असं वागतोय हे त्यांना फेक वाटू शकतं. हे मलाही फेक वाटतंय. त्यामुळे त्याने असं नाही केलं पाहिजे."


अरबाजचे बाबा मुलाखतीत पुढे म्हणाले की, "अरबाजने वैभव, जान्हवीसोबत चांगला गेम खेळला पाहिजे. कारण निक्की अभिजीतला काहीतरी वेगळं सांगते आणि अरबाजला काहीतरी वेगळं सांगते. ती अरबाजला लांबही करते अन् जवळही करते. अरबाजला तिने चक्रव्यूहात गुंतवून टाकलंय हे दिसतंय." अशाप्रकारे अरबाजच्या बाबांनी लेकाच्या खेळाबद्दल त्यांचं मत व्यक्त केलंय. त्यांनी लेकाच्या चुकांना चूक म्हटलेलं दिसत असून त्याचा गेम सुधारावा, अशी त्यांना आशा आहे.

,

Web Title: arbaz patel father arman patel talk about relationship between arbaz patel and nikki tamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.