Bigg Boss 16 Finale : तारा सिंग व सकीनाने गेमच बदलला...! अर्चना गौतमचं ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 08:29 PM2023-02-12T20:29:57+5:302023-02-12T22:24:29+5:30
Bigg Boss 16 Finale Live Updates: बिग बॉसच्या १६ व्या सीझनचा टीआरपी आणण्यात अर्चना गौतमचा मोठा वाटा होता. मात्र...
Bigg Boss 16 Finale : बिग बॉसचा १६ वा सीझन धमाकेदार ग्रॅण्ड फिनाले सुरू झाला आणि हा सीझन कोण जिंकणार, हे जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी, एम सी स्टॅन, अर्चना गौतम आणि शालीन भनोट हे पाच स्पर्धक फायनलमध्ये पोहोचलेत. पण यापैकी दोन स्पर्धकांचं बिग बॉस जिंकण्याचं स्वप्न भंगलं. शालीन भनोट सुरूवातीलाच टॉप ५ मधून बाद झाला. यानंतर अर्चना गौतम हिचा सुद्धा बिग बॉसमधला प्रवास संपुष्टात आला.
ARCHANA GAUTAM BB K SAATH PERFORMANCE 🔥❤️ OMG BEST PART IM SO EXCITED FOR THE EPISODE TONIGHT ❤️
— 𝑨𝒏𝒂𝒚𝒂 ♛ (@anayabananaxe) February 12, 2023
VEERANGANA ARCHANA ❤️ #ArchanaGautam#ArchanaGautam𓃵#BB16 #BiggBoss #BiggBoss16 #PriyankaChaharChoudhary#VoteForArchana#ArchanaDeservesToWinpic.twitter.com/DE9Y8BhsE0
'बिग बॉस १६'च्या ग्रॅण्ड फिनालेच्या रंगारंग ग्रॅण्ड फिनालेमध्ये एकापेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्स झालेत. भारती व अभिषेक कृष्णाच्या कॉमेडीनं फिनालेला विनोदाचा तडका लावण्यात आला. शिवाय प्रमोशनची धूमही पाहायला मिळाली. सनी देओल व अमीषा पटेल यांनीही बिग बॉसच्या फिनालेमध्ये प्रमोशनची संधी साधली. गदर २ या आपल्या आगामी सिनेमासाठी दोघांनी शोमध्ये हजेरी लावली.
दोघांनी एक गेमही खेळला. गदरमध्ये सनी देओल हँडपम्प उखडतो. हाच गेम त्याने बिग बॉसमध्ये खेळला. टॉप ४स्पर्धकांना त्याने हँडपम्प उखडायला लावला आणि या खेळात अर्चना बाद झाली.
शालीन व अर्चनानंतर बिग बॉसला टॉप ३ स्पर्धक मिळाले आहेत. शिव ठाकरे, प्रियंका आणि एमसी स्टॅन हे तीन स्पर्धक आता टॉप ३ मध्ये उरले असून, यापैकी बिग बॉसची ट्राफी कोण जिंकतो, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.
तूर्तास तरी प्रियंका व शिव ठाकरेचं पारडं जड आहे. यातही प्रियंकाच हा शो जिंकणार, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
#ArchanaGautam: she doesn't play, she SLAY.#Biggboss16pic.twitter.com/FtPp7Vfelw
— ˝ (@holdonbytches) February 7, 2023
अर्चना का झाली बाद?
बिग बॉसच्या सोळाव्या सीझनचा टीआरपी आणण्यात अर्चना गौतमचा मोठा वाटा होता. मात्र असं असूनही फिनाले जवळ आला असताना ती विजेतेपदापासून बरीच दूर असल्याचं दिसलं. संपूर्ण सिझनमध्ये अर्चना विविध कारणांमुळे चर्चेत होती. मात्र तिची खेळीच आता तिच्याविरोधात उलटताना दिसली.
अर्चनाला एंटरटेन्मेंट क्वीन म्हटलं जातं. या सिझनमध्ये तिने तिच्या अतरंगी कारनाम्यांमुळे प्रेक्षकांना खूप हसवलं. मात्र यासोबत एंटरटेन्मेट क्वीनसोबतच अर्चनाला ‘वॅम्प’ असंही म्हटलं गेलं. तिचे वाद, तिचं ओरडणं अनेकांना आवडलं नाही. तिची काही वादग्रस्त विधानंही तिला भोवलीत. मुळे तिची नकारात्मक इमेज तयार झाली आहे. अर्चनाने ज्यांच्यासोबत आधी मैत्री केली, त्यांनाच नंतर तिने खरंखोटं सुनावलं. मग ती प्रियांका असो किंवा सौंदर्या. सौंदर्यासोबत अर्चनाची अनेकदा भांडणं झाली.