नवज्योत सिंग सिद्धू परतणार का द कपिल शर्मा शोमध्ये? अर्चना पुरण सिंगच्या मनात आहे धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 15:50 IST2021-01-15T15:46:49+5:302021-01-15T15:50:17+5:30
या व्हिडिओत सिद्धू परत येतोय हे ऐकल्यावर अर्चनाची अवस्था काय होते हे आपल्याला पाहायला मिळत आहे.

नवज्योत सिंग सिद्धू परतणार का द कपिल शर्मा शोमध्ये? अर्चना पुरण सिंगच्या मनात आहे धास्ती
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचा नवज्योत सिंग सिद्धू अनेक वर्षं एक भाग होते. पण गेल्या वर्षी त्यांची जागा अर्चना पुरण सिंगने घेतली. सिद्धू या कार्यक्रमात आता नसले तरी अनेकवेळा त्यांचा उल्लेख कार्यक्रमात केला जातो. अर्चनाने सिद्धू यांची जागा हुशारीने पटकावली असे कपिल तिला नेहमीच चिडवत असतो. आता अर्चनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सिद्धू परत येतोय हे ऐकल्यावर अर्चनाची अवस्था काय होते हे आपल्याला पाहायला मिळत आहे.
द कपिल शर्मा शो मध्ये एका भागात प्रियंका चोप्राने हजेरी लावली होती. या भागात एक व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली होती. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये अर्चना पुरणसिंग तिची व्हॅनिटी व्हॅन शोधत आहे. तिला व्हॅन कुठेच दिसत नसल्याने ती तेथील एका क्रू मेंबरला विचारते की, माझी व्हॅनिटी व्हॅन कुठे आहे? त्यावर तो उत्तर देतो की, तुमची व्हॅनिटी व्हॅन आज नाहीये. त्यावर ती लगेचच त्याला विचारते सिद्धू परत आले का? त्यावर क्रू मेंबर सांगतो की, प्रियंका चोप्रा आल्या आहेत, तुमची व्हॅनिटी व्हॅन त्यांना दिलेली आहे आणि त्यामुळेच तुम्ही घरूनच तयार होऊन या... असा तुम्हाला मेसेज केला होता.
त्यावर अर्चना सांगते, मी आवरून आले आहे. पण मला कपडे बदलायचे आहेत. त्यावर तो क्रू मेंबर सांगतो, तुमच्यासाठी खास ग्रीन रूम बनवली आहे. तुम्ही तिथे कपडे बदलू शकता. ती ग्रीन रूम पाहिल्यावर अर्चना म्हणते, तुम्ही रूमवर केवळ हिरव्या रंगाचे पडदे लावतात आणि रूमला ग्रीन रूम म्हणतात. तसेच तुम्ही प्रोडक्शनवाले अर्धाच नाश्ता देता... चिटिंग करता... माझ्याकडे दुसरे काम असते तर मी हा कार्यक्रम सोडला असता... सोडला असता काय केलाच नसता असे म्हणत ती त्यांंची मस्करी करताना दिसली.