'बिग बॉस मराठी 2': 'या' कारणांवरुन नेहा आणि टीममध्ये पेटला वादंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 03:53 PM2019-06-13T15:53:53+5:302019-06-13T16:11:41+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या शाळा सुटली पाटी फुटली या टास्कमध्ये प्रत्येक टीमने विद्यार्थी झालेल्या सदस्यांना नापास करायचे आहे.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या शाळा सुटली पाटी फुटली या टास्कमध्ये प्रत्येक टीमने विद्यार्थी झालेल्या सदस्यांना नापास करायचे आहे. यावरून नेहा, शिवानी, अभिजित केळकर, माधव देवचके, दिंगबर नाईक, विद्याधर जोशी, अभिजीत बिचुकले यांच्यामध्ये मतभेद झालेले दिसणार आहेत.
दुसऱ्या टीममधील कोणत्या सदस्याला नापास करायचे हे टीमला सर्वानुमते ठरवायचे आहे. नेहाच्या म्हणण्यानुसार तिला रुपालीला नापास करायचे आहे परंतु अभिजीत केळकरचे असे म्हणणे आहे, कि माझ्याकडे रूपालीला नापास करायला काही कारण नाहीये. तर माधव, दिगंबर, विद्याधर आणि अभिजीत बिचुकले, केळकर यांचे म्हणणे पडले शिव काहीच करत नाहीये त्यामुळे शिवला नापास करायला हवे... यावर नेहाने नाराजगी व्यक्त केली “सगळेच जण हत्यार टाकून बसून जातात, बोलायची वेळ येते तेव्हा”...
आता पुढे या टास्क मध्ये अकय होईल शिक्षक बनलेले सदस्य कोणाला नापास करतील ? कोणामध्ये कॅप्टनसी टास्क रंगेल ? आणि कोण घराचा कॅप्टन बनेल ? हे बघणे रंजक असणार आहे...