सेक्स रॅकेटमध्ये अडकली 'बिग बॉस' फेम या अभिनेत्याची एक्स गर्लफ्रेंड, पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 03:17 PM2020-01-10T15:17:44+5:302020-01-10T15:18:31+5:30
हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये बिग बॉस १३च्या स्पर्धकाच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत आणखीन एका अभिनेत्रीला अटक केली आहे.
बिग बॉस १३चा स्पर्धक अरहान खानवर त्याची एक्स गर्लफ्रेंड अमृता धनोओने बरेच आरोप केले होते. अमृता मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत होती. आता असे वृत्त समोर आलंय की तिला पोलिसांनी अटक केली आहे. अमृताला काल रात्री पोलिसांनी पंचतारांकित हॉटेलमधून अटक केली आहे.
अमृता धनोओसोबत ऋचा सिंग नामक मुलीलाही पकडले आहे. ही स्ट्रगलिंग अॅक्ट्रेस आहे. पोलिसांना गोरेगाव मधील वेस्टीन या पंचतारांकित हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या हॉटेलवर छापा मारला. ही माहिती दिंडोशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस धर्मेंद्र कांबळे यांनी दिली आहे.
अमर उजालाशी बोलताना त्यांनी सांगितलं की, माहिती मिळाल्यानंतर आम्ही हॉटेलवर छापा मारला. तिथे ३२ वर्षीय अमृता धनोआ व २६ वर्षीय ऋचा सिंग यांना अटक करण्यात आली आहे.
अमृता अरहानबद्दल बोलली होती की, अरहान पाच वर्षे माझ्यासोबत लिव इन रिलेशनशीपमध्ये राहिला होता. तो फ्रॉड आहे. त्यामुळे त्याला घरातून बाहरे काढले होते.
ती पुढे म्हणाली की, दोन वर्षांपूर्वी अरहानला एक लाख रुपये दिले होते. त्यावेळी तो बढो बहू मालिकेत काम करत होता. अरहानने अद्याप तिचे पैसे परत दिले नाहीत.
अरहान बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अमृताने अरहानबद्दल सांगितलं. ती म्हणाली की, अरहान शोच्या बाहेर पडल्यापासून त्याला फोन करते आहे. पण, तो फोन कट करतो आहे. तो मला घाबरला आहे. यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत अमृताने सांगितलं होतं की, अरहान शोमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा कायदेशीर कारवाई करणार आहे.