'मंगलम दंगलम'मध्ये लग्नाच्या दिवशीच अर्जुनचे अपहरण, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 06:30 AM2019-01-24T06:30:00+5:302019-01-24T06:30:00+5:30
सासरा व त्याचा होणारा जावई यांच्यामधील कडूगोड भांडणांनंतर, आता सोनी सबच्या 'मंगलम दंगलम'मध्ये शेवटी लग्नाचा दिवस उजाडला.
सासरा व त्याचा होणारा जावई यांच्यामधील कडूगोड भांडणांनंतर, आता सोनी सबच्या 'मंगलम दंगलम'मध्ये शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. लावण्यासोबत मिळून गुपचूपपणे अर्जुन व रुमी यांच्या लग्नामध्ये अडचणी आणण्यामध्ये मदत करणाऱ्या मिसेस कुट्टीचे सत्य सर्वांसमोर येते.
रुमी आपल्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे, तर संजीव सकलेचा मिसेस कुट्टीचे हेतू समोर आणण्यासाठी एक व्हिडिओ सर्वांना दाखवतात. त्यानंतर मिसेस कुट्टी अर्जुनसमोर आपली निर्दोषता सांगण्याकरिता पुढे होते, तेव्हा ही गोष्ट समोर येते की अर्जुनच्या जागी वर कोणी दुसराच असतो. त्यानंतर लगेचच लावण्याचा व्हिडिओ कॉल येतो, ती अर्जुनसोबत विवाह करण्याचा आपला हेतू साध्य करण्याकरिता त्याचे अपहरण करते. पण, रुमी मोठ्या चातुर्याने अर्जुनचा पत्ता शोधते आणि संपूर्ण कुटुंब त्याच्या शोधात निघते. प्रत्येकजण हे पाहून थक्क होतो की, लावण्या बंदूक ताणून धरत तिच्या धाकावर अर्जुनसोबत बळजबरीने लग्न करणार आहे.
सकलेचा आणि कुट्टी परिवार अर्जुनला वाचवू शकतील का? अर्जुनची भूमिका साकारणारा करणवीर शर्मा म्हणाला, कुणाहीसाठी लग्नाचा दिवस खूपच खास असतो, पण वराचेच अपहरण झाले तर काय घडेल. आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या दिवशीच अर्जुनचे अपहरण करण्यात येते. आगामी एपिसोड्स नाट्य व भावनांनी ओतप्रोत भरलेले असतील, जे नक्कीच आमच्या दर्शकांचे भरपूर मनोरंजन करतील. आणि लग्न होईल की अर्जुनचे लग्न रुमीसोबत होईल, हे प्रेक्षकांना पाहण्याजोगे असेल. 'मंगलम दंगलम: कभी प्यार, कभी वार' सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त सोनी सबवर पाहता येईल.