'इंडिया के मस्त कलंदर' शोमध्ये अतरंगी कलाकारांची कलाकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 02:43 PM2018-07-25T14:43:40+5:302018-07-25T14:43:59+5:30
'इंडिया के मस्त कलंदर' या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत मिका सिंग आणि गीता कपूर दिसणार आहेत.
सोनी सब वाहिनीवर 'इंडिया के मस्त कलंदर' हा रिएलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'इंडिया के मस्त कलंदर' या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत मिका सिंग आणि गीता कपूर दिसणार आहेत. सुमीत राघवन आणि राजीव ठाकूर निवेदन करताना दिसणार आहे.
परीक्षक मिका सिंग म्हणाले की, 'इतर सर्व रिएलिटी शोपेक्षा इंडिया के मस्त कलंदरपेक्षा वेगळा आहे. या शोचा कन्सेप्ट खूप वेगळा आहे. एकाच मंचावर सिंगिंग, डान्सिग व कॉमेडी असे टॅलेंट पाहायला मिळणार आहे.मी सिंगर्सचे परीक्षण करेन. कोरियोग्राफर गीता डान्सर्सना जज करेल आणि कॉमेडी मजा सगळेच लुटतील. या शोमध्ये वेगवेगळे टॅलेंट पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.'
पहिल्या दोन एपिसोड्समधून तूफान मनोरंजन होईल. त्यात परीक्षक गीता कपूर अतरंगी आर्टिस्टसोबत दिसणार आहेत. अतरंगी बाबापासून फ्लाइंग जाट तसेच बॉलीपपेट्स अशा विविध प्रकारचे आगळेवेगळे टॅलेंट या वेळी पाहता येईल. मुलांचे हे ग्रूप विविध प्रकारचे रूप घेऊन नाचतात. 'इंडिया के मस्त कलंदर'मध्ये खूप काही पाहण्याची संधी मिळणार आहे. सोनी सबकडून या शोसोबत जास्तीत जास्त आनंद देण्याचे वचन पाळले जाणार आहे आणि ते दर शनिवार आणि रविवारी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणतील. या खास रिअलिटी शोमधून फक्त स्पर्धकांचेच टॅलेंटच नव्हे तर त्यांनी भोगलेले कष्ट आणि सर्व कठीण परिस्थितीत उभे राहण्याची त्यांची क्षमता हेही पाहता येईल. 'इंडिया के मस्त कलंदर' कार्यक्रम दर शनिवार आणि रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी सबवर पाहता येणार आहे.