ह्या मालिकेसाठी दररोज दोन तास प्रवास करायला तयार झाल्या अरूणा इराणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 07:15 AM2019-01-27T07:15:00+5:302019-01-27T07:15:00+5:30

स्टार प्लस वाहिनीवर दिल तो हॅपी है जी ही नवी मालिका नुकतीच दाखल झाली आहे.

Aruna Irani is ready to travel two hours daily for this series | ह्या मालिकेसाठी दररोज दोन तास प्रवास करायला तयार झाल्या अरूणा इराणी

ह्या मालिकेसाठी दररोज दोन तास प्रवास करायला तयार झाल्या अरूणा इराणी

googlenewsNext
ठळक मुद्दे'दिल तो हॅपी है जी' मालिका आली प्रेक्षकांच्या भेटीला

स्टार प्लस वाहिनीवर दिल तो हॅपी है जी ही नवी मालिका नुकतीच दाखल झाली आहे. या मालिकेत दादीची भूमिका अरूणा इराणी साकारत आहेत. या मालिकेच्या सेटवर पोहचण्यासाठी दररोज दोन तास प्रवास करावा लागतो. पण, त्यांना चित्रपटाच्या सेटवर पोहचण्यासाठी दोन तास प्रवास करावा लागतो पण
त्यांना ते आवडते.


अरूणाजी सिनेइंडस्ट्रीमध्ये सुमारे ६ दशके काम करत असल्या तरी आजही मनाने त्या तरूण आहेत आणि त्यांना आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत काम करत राहायचे आहे. ह्या मालिकेत त्या खडूस दादीची भूमिका करत असून त्याबद्दल त्या अतिशय उत्साहात आहेत. आपल्या प्रवासाला लागणाऱ्या वेळाबद्दल त्या
म्हणतात, “सुरूवातीला मी अनेक ऑफर्स नाकारल्या कारण मला खूप प्रवास करावा लागणार होता पण नंतर मात्र मला त्याचे वाईट वाटले. पण ‘दिल तो हॅपी है जी’ मला एवढी आवडली की त्यासाठी प्रवास करायलाही तयार आहे. मी माझे मन पक्के केले आहे कारण बहुतेक सेट शहरापासून लांबच आहेत आणि जर
मला काम करत राहायचे असेल तर मला प्रवास हा करायलाच हवा.”
'दिल तो हॅपी है जी' मालिकेची निर्मिती इश्कबाज व कुल्फी कुमार बाजेवालाचे निर्माते गुल खान करत आहेत. ‘दिल तो हॅपी है जी’ दर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्लसवर पाहता येईल.
 

Web Title: Aruna Irani is ready to travel two hours daily for this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.