अरुणा इराणींचे छोट्या पडद्यावर कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 06:30 IST2019-01-07T06:30:00+5:302019-01-07T06:30:00+5:30
ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी आता तब्बल १४ वर्षांनंतर ‘दिल तो हॅप्पी है जी’ या नव्या मालिकेतील भूमिकेद्वारे स्टार प्लसवर पुनरागमन करणार आहेत.

अरुणा इराणींचे छोट्या पडद्यावर कमबॅक
स्टार प्लस वाहिनीवरील ‘देस में निकला होगा चाँद’ मालिका आणि ‘हसीना मान जाएगी’ या चित्रपटातील बुआजीच्या भूमिकेबद्दल विख्यात असलेली ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी आता तब्बल १४ वर्षांनंतर ‘दिल तो हॅप्पी है जी’ या नव्या मालिकेतील भूमिकेद्वारे स्टार प्लसवर पुनरागमन करणार आहेत.
‘दिल तो हॅप्पी है जी’ या मालिकेचे प्रोमो आता सुरू झाले असून एका तरूण मुलीभोवती या मालिकेचे कथानक गुंफण्यात आले आहे. हॅप्पी नावाची ही मुलगी कोणत्याही परिस्थितीची नेहमी चांगली बाजूच लक्षात घेत असते आणि इतरांच्या जीवनात आनंद पसरविणे हाच तिच्या जीवनाचा मुख्य उद्देश असतो. या मालिकेत अरुणा इराणी आजीच्या भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या व्यक्तिरेखेविषयी अरुणा इराणी म्हणाल्या, “इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर या वाहिनीवर परतताना मलाही आनंद होत आहे. माझ्या दादीजीच्या व्यक्तिरेखेला अनेक पैलू असल्याने आणि मला या मालिकेची कथा एकदम पसंत पडल्याने मी या भूमिकेला होकार दिला. गुल खानबरोबर काम करणे म्हणजे आपल्याच घरचे कार्य आहे; कारण मी तिला अनेक वर्षं ओळखते. सेटवर सर्वचजण माझी खूप काळजी घेत असतात आणि मलाही त्यांच्याबरोबर वेळ
व्यतीत करायला आवडते.” अरुणाजींना या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. १५ जानेवारीपासून संध्याकाळी ७.३० वाजता ‘दिल तो हॅप्पी है जी’ मालिका फक्त ‘स्टार प्लस’वर पाहायला मिळणार आहे.