'अरुंधतीची वेदना मी अक्षरश: जगलेय','आई कुठे काय करते'मधील अरूंधती उर्फ मधुराणीची भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 02:53 PM2021-08-05T14:53:49+5:302021-08-05T14:54:14+5:30

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील भावनिक वळण सध्या प्रत्येकाच्याच मनाला चुटपुट लावणारे आहे.

An Arundhati aka Madhurani's emotional post in 'Arundhati's pain I literally survived', 'Where does mother do what' | 'अरुंधतीची वेदना मी अक्षरश: जगलेय','आई कुठे काय करते'मधील अरूंधती उर्फ मधुराणीची भावनिक पोस्ट

'अरुंधतीची वेदना मी अक्षरश: जगलेय','आई कुठे काय करते'मधील अरूंधती उर्फ मधुराणीची भावनिक पोस्ट

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'ने फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या घरात मन केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत अरूंधतीच्या भूमिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर पहायला मिळते आहे. मधुराणी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर अरूंधतीशी निगडीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. आहेत.  
आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्ध आणि अरुंधतीचा २५ वर्षांचा संसार अखेर संपला आहे. घटस्फोटानंतर अरुंधतीने देशमुखांचे घर सोडून तिच्या माहेरी गेली आहे. अरुंधतीला घर आणि आपली माणसं सोडताना ज्या वेदना झाल्या त्याच वेदना अनुभवताना प्रेक्षकांनाही अश्रू अनावर झाले होते.


अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरनेदेखील एक भावनिक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले की, ‘२५ वर्षं जो संसार इतका जीव जडवून केला, तो डोळ्यासमोर उन्मळून पडताना पाहणं, जी माणसं जीवापाड जपली त्यांना सोडून जाणं, आपलं आत्तापर्यंतचं अस्तित्व पूर्णपणे पुसून टाकून, नव्याने सुरुवात करणं हे अरुंधतीच्या आयुष्यात आलेलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. किती वेदनेतून जात असेल ती. 


ती पुढे म्हणाली की,हे गेले सर्व एपिसोड आम्ही सगळेच अरुंधतीची ही वेदना अक्षरशः जगलोय आणि ह्या सगळ्याला आपण प्रेक्षकांनी सुद्धा इतका मायाळू प्रतिसाद दिलात की आम्ही भारावून गेलोय. असंख्य फोन आणि मेसेजेस मधून जाणवते की अरुंधतीमध्ये सगळे किती गुंतलेत. पुन्हा पुन्हा ही अशी भूमिका करायला मिळाल्याबद्दल परमेश्वर आणि रंगदेवतेचे आभार मानावेसे वाटतात.

स्टार प्रवाह वाहिनी, निर्माते राजन शाही, लेखिका नमिता वर्तक आणि मुग्धा गोडबोले, दिग्दर्शक रवींद्र करमरकर आणि सर्व सहकलाकारांच्या मी कायम ऋणात असेन. आई कुठे काय करते मालिका आणि आजवरच्या अरुंधतीच्या प्रवासात प्रेक्षकांनी मोलाची साथ दिली आहे. यापुढेही अशीच साथ मिळेल ही आशा आहे, असे मधुराणीने पोस्टमध्ये म्हटलंय.

Web Title: An Arundhati aka Madhurani's emotional post in 'Arundhati's pain I literally survived', 'Where does mother do what'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.