'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीचा 'तो' व्हिडीओ आला चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 12:47 PM2022-02-26T12:47:53+5:302022-02-26T12:48:16+5:30

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे.

Arundhati's 'this' video from the series 'Where does mother do what?' | 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीचा 'तो' व्हिडीओ आला चर्चेत

'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीचा 'तो' व्हिडीओ आला चर्चेत

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्व पात्रांना रसिकांची पसंती मिळताना दिसते आहे. या मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. मालिकेत सध्या अरुंधतीने आपल्या पहिल्या म्युझिक अल्बमचे रेकॉर्डिंग केले आहे. खऱ्या आयुष्यातही मधुराणी खूप छान गाते. मधुराणीने नुकताच तिच्या गाण्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची खूपच पसंती मिळते आहे.

अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर गाणे गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून तिने लिहिले की, मुझे जा न कहो मेरी जा. तिच्या या व्हिडीओला खूपच पसंती मिळते आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. 


आई कुठे काय करते मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत नुकतेच अरुंधती देशमुख कुटुंबाचा समृद्धी बंगला सोडून बाहेर पडली आहे. ती डोबिंवलीत आईकडे राहत आहे आणि सध्या ती राहण्यासाठी नवीन घर शोधते आहे. ती घटस्फोटीत असल्यामुळे तिला घर मिळणे कठीण झाले आहे. मात्र आता नवीन घर शोधण्यासाठी अरुंधतीला आशुतोष मदत करणार आहे. तर दुसरीकडे संजनाने कांचन आईचे कान भरले आहेत आणि त्या दोघी आता अरुंधतीला घरावरील हक्क सोडण्यासाठी सांगणार आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Arundhati's 'this' video from the series 'Where does mother do what?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.