Video: शेखर येताच संजनाला पडला अनिरुद्धचा विसर; पाहा रुपाली-मयुरचं भन्नाट रिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 18:26 IST2022-07-01T18:25:21+5:302022-07-01T18:26:00+5:30
Rupali bhosale: या व्हिडीओमध्ये रुपाली आणि मयूर मजेशीर पद्धतीने डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर संजनाला अनिरुद्धचा विसर पडलाय असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

Video: शेखर येताच संजनाला पडला अनिरुद्धचा विसर; पाहा रुपाली-मयुरचं भन्नाट रिल
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे या मालिकेत कलाकारांचं एकमेकांसोबतचं बॉण्डिंग दिसून येतं. तसंच नातं या कलाकारांचं पडद्यामागेही आहे. त्यामुळेच ही कलाकार मंडळी अनेकदा सेटवरील मज्जामस्ती करतानाच्या काही पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या सोशल मीडियावर संजनाचा आणि शेखऱचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वीच या मालिकेत शेखरने म्हणजेच अभिनेता मयूर खांडगे (mayur khandge)याने ब्रेक घेतला होता. मात्र, आता पुन्हा एकदा त्याने या मालिकेत रिएन्ट्री केली आहे. विशेष म्हणजे मयूर मालिकेत पुन्हा आल्यामुळे संजनाला अपार आनंद झाला असून तिने त्याच्यासोबत एक इन्स्टा रिल तयार केलं आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रुपाली भोसले (rupali bhosale) हिने मयूरसोबत एक मजेशीर रिल शेअर केलं आहे. या व्हिडीओमध्ये रुपाली आणि मयूर मजेशीर पद्धतीने डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर संजनाला अनिरुद्धचा विसर पडलाय असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या मालिकेत रुपाली आणि मयूर यांनी पती-पत्नीची भूमिका साकारली आहे. संजनाने अनिरुद्धच्या प्रेमापोटी शेखरसोबत कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. परंतु, शेखरच्या स्वभावामुळे त्याने देशमुख कुटुंबियांनादेखील आपलंसं केलं आहे. त्यामुळे वरचेवर तो देशमुखांच्या घऱी येत असतो आणि प्रत्येक वेळी संजनाचा पाणउतारा करतो. त्यामुळे या दोघांची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडते.