आशा भोसलेनी पार पाडली 'ही' भूमिका !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 04:24 PM2018-09-03T16:24:50+5:302018-09-03T16:39:52+5:30
आपल्या मधाळ आवाजाने गेली अनेक वर्षे रसिकांचे कान तृप्त करणाऱ्या महान पार्श्वगायिका आशा भोसले यांनी ‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’ कार्यक्रमातील एका लहान स्पर्धक मुलीची केशरचना केली
आपल्या मधाळ आवाजाने गेली अनेक वर्षे रसिकांचे कान तृप्त करणाऱ्या गायिका आशा भोसले यांनी ‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’ कार्यक्रमातील एका लहान स्पर्धक मुलीची हेअरस्टाईल केली. आपल्या गोड आणि सुरेल आवजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेली12 वर्षांची सौम्या ही आशा भोसले यांची मोठी चाहती आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आशा भोसले यांनी केवळ सौम्याची केशरचनाच केली असे नव्हे, तर निर्मात्यांना सांगितले की यापुढील भागांमध्येही सौम्याची हीच केशरचना ठेवली जावी. त्या म्हणाल्या की सौम्याकडे पाहून आपल्याला आपण लहानपणी जशा दिसत होतो, त्याची आठवण येते. त्यामुळे तिचा चेहरा असाच कायम दिसावा, यासाठी तिची केशरचना अशीच कायम ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात आशाताई म्हणाल्या, “सौम्या ही एक अतिशय गुणी मुलगी असून मी तिची पूर्वीची कामगिरीही पाहिलेली आहे. ती जशी गाते आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव बघून मी खूपच प्रभावित झाले आहे. मी माझं बालपण तिच्यात पाहते. त्यामुळे ती माझ्यासारखीच दिसावी, अशी माझी इच्छा होती. मी शाळेत असताना माझे केस जसे बांधायची, तसेच मी तिचे केस बांधले आहेत.” या कार्यक्रमात आशा भोसले यांनी स्पर्धक आणि परीक्षकांसह कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला आणि आपली काही अजरामर गीते गायली.
हिंदुस्तानी-2’ हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे देशांच्या सीमा पुसून टाकणारा आणि हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअॅलिटी शो आहे. या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात.