Ashadhi Ekadashi : "माऊली तुझे आभार, आजवर फक्त...", संत नामदेवांची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 12:35 PM2024-07-17T12:35:51+5:302024-07-17T12:36:38+5:30
"कॅमेरासमोर का होईना पण माऊलीची हृदयाच्या अंतःकरणापासून सेवा करायला मिळाली", आषाढी एकादशीनिमित्त अभिनेत्याची पोस्ट
Ashadhi Ekadashi 2024 : दरवर्षी आषाढी एकादशीचा मोठा उत्साह संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतो. यंदाही मोठ्या उत्साहास आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात आणि राज्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. तर सोशल मीडियावरही विठ्ठल रखुमाईचे फोटो आणि वारीतील व्हिडिओ पोस्ट करत शुभेच्छा दिल्या जात आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही आषाढी एकादशीनिमित्त पोस्ट केल्या आहेत.
मराठी अभिनेता संकेत कोर्लेकरने त्याच्या इन्स्टाग्राम आषाढी एकादशीनिमित्त एक खास पोस्ट केली आहे. संकेतने त्याच्या मालिकेतील काही फोटो पोस्ट केले आहेत. "माऊली तुझे आभार...आजवर फक्त कमाल आणि कमालच भूमिका नशिबात आल्या. ज्यांनी मला प्रचंड आशीर्वाद दिले. त्याच आशिर्वादाने इतकी वर्ष चित्रपटसृष्टीत टिकवून ठेवलंय. श्री संत नामदेव ही त्यातलीच एक भावलेली भूमिका...कॅमेरासमोर का होईना पण माऊलीची हृदयाच्या अंतःकरणापासून सेवा करायला मिळाली. सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
संकेतच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. संकेतने 'विठू माऊली' या मालिकेत संत नामदेव ही भूमिका साकारली होती. या मालिकेने संकेतला एक वेगळी ओळख मिळवून दिली. संकतने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची यशोगाथा', 'लेक माझी दुर्गा', 'अजूनही बरसात आहे', 'हम बने तुम बने' या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना तो दिसला. तर 'टकाटक' या सिनेमातही त्याने काम केलं आहे. सध्या संकेत अंतरपाट या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
संकेतचं Korlekarmania हे युट्यूब चॅनेल आहे. त्याचे युट्यूबवर जवळपास साडेतीन लाख सबस्क्राइबर्स आहेत. संकेतचे त्याच्या बहिणीबरोबर व्हिडिओ बनवत असतो. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.