​अस्सं सासर सुरेख बाई फेम मृणाल दुसानीस भारतात परतणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2017 11:07 AM2017-05-03T11:07:46+5:302017-05-03T16:37:46+5:30

मृणाल दुसानीस अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत एक आज्ञाधारक सून, पत्नी या भूमिकेत ...

Ashan Sasar Sunder Bai Fame Mrinal Dusnis returns to India | ​अस्सं सासर सुरेख बाई फेम मृणाल दुसानीस भारतात परतणार

​अस्सं सासर सुरेख बाई फेम मृणाल दुसानीस भारतात परतणार

googlenewsNext
णाल दुसानीस अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत एक आज्ञाधारक सून, पत्नी या भूमिकेत प्रेक्षकांना तिला पाहायला मिळत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून मालिकेच्या चित्रीकरणातून वेळ काढून मृणाल अमेरिकेला गेली आहे. 
मृणालचे गेल्या वर्षी अमेरिकास्थित नीरज मोरेशी लग्न झाले होते. नाशिकमध्ये जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत तिने लग्न केले होते. नीरज हा मुळचा पुण्याचा असून सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मृणाल आणि त्याची भेट लॉस एंजिलिसमध्ये झाली होती. लॉस एंजिलिसला महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमानिमित्त मृणाल गेली असता नीरज मोरेसोबत तिची ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये संवाद वाढला आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अमेरिकतून एमएस केल्यानंतर नीरज आता लॉस एंजिलिस येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतोय. पुढची किमान दोन वर्षं तरी तो अमेरिकेतच राहणार असल्यामुळे मृणालही तिची मालिका संपल्यावर अमेरिकेत जाणार आहे.
मृणाल आणि नीरज यांचे लग्न झाल्यापासून मृणाल मालिकेत व्यग्र असल्याने तिला नीरजला वेळच देता येत नव्हता. त्यामुळे आता मालिकेच्या चित्रीकरणातून वेळ काढून मृणाल नवऱ्याला भेटायला अमेरिकेला गेली होती. तिने यासाठी मालिकेच्या टीमकडून तब्बल एक महिन्याची सुट्टीदेखील घेतली होती. पण आता तिची ही सुट्टी संपली असून ती लवकरच भारतात परतणार आहे. पुढील काहीच दिवसांत ती पुन्हा मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील करणार आहे.
मृणालची अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मृणाल परत येणार या बातमीमुळे तिच्या फॅन्सना नक्कीच आनंद झाला आहे.  

Web Title: Ashan Sasar Sunder Bai Fame Mrinal Dusnis returns to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.