आशी सिंगला लहानपणापासून आहे 'या' गोष्टीची आवड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 06:37 AM2018-04-14T06:37:21+5:302018-04-14T12:07:21+5:30

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ये उन दिनों की बात है’ मालिकेत सरळमार्गी नैनाची भूमिका साकारणारी आशी सिंह तिच्या नृत्यकौशल्याबद्दल तिच्या ...

Ashi Singh has been a child since childhood | आशी सिंगला लहानपणापासून आहे 'या' गोष्टीची आवड

आशी सिंगला लहानपणापासून आहे 'या' गोष्टीची आवड

googlenewsNext
नी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ये उन दिनों की बात है’ मालिकेत सरळमार्गी नैनाची भूमिका साकारणारी आशी सिंह तिच्या नृत्यकौशल्याबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. मालिकेतील आगामी काही भागांची गरज म्हणून ती एका शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवीत आहे. या मालिकेत काम करण्यापूर्वी आशीला नवीन नृत्यप्रकार शिकण्याची इच्छा होती. आपल्या चाहत्यांना त्यांनी यापूर्वी न पाहिलेले तिचे नृत्य कौशल्य दाखविण्याची ही नामी संधी तिला मिळाली आहे.
 
आशी सांगते, “मला नृत्य खूप आवडत असल्याने पडद्यावर नृत्य करायची संधी मिळाल्याने मी रोमांचित झाले आहे. आणि हा भाग पाहून प्रेक्षकांचे देखील प्रेक्षकांना देखील मनोरंजन होईल. मला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती आणि मी बर्‍याच बॉलीवूड गीतांवर नृत्य सादर केलेले आहे. काही दिवसांपूर्वी एका लग्न समारंभाच्या चित्रणात मी 90च्या दशकातील एका गीतावर नृत्य केले होते जे सर्वांना खूप आवडले होते. मला पहिल्यापासून शास्त्रीय नृत्य शिकायचे होते पण या ना त्या कारणामुळे मला ते जमले नाही. मला आनंद होतो आहे की, या कथानकामुळे मला शास्त्रीय नृत्याच्या काही स्टेप्स शिकण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. मला थोडी धाकधूक देखील होते आहे आणि आशा आहे की, प्रेक्षकांना माझा परफॉर्मन्स आवडेल.” 
 
येत्या भागांत नैना शाळेतील एका नृत्य स्पर्धेत भाग घेते. या स्पर्धेच्या विजेत्याला दिल्लीला होणार्‍या पुढच्या टप्प्यात सहभागी होण्याची संधी मिळणार असते. नैनासाठी हे मोठे आमिष आहे कारण तिला दिल्लीला जाऊन समीरला भेटता येईल. पुढे काय होईल? नैना स्पर्धेत जिंकेल काय? एकमेकांपासून दूर गेलेले दोन प्रेमी जीव दिल्लीत भेटतील का? 

Web Title: Ashi Singh has been a child since childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.