नातवंडांसह नव्या वर्षात सुरु झालीय अशोक मा.मा. यांची सेकंड इनिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:10 IST2025-01-09T17:10:13+5:302025-01-09T17:10:55+5:30

Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सध्या छोट्या पडद्यावर काम करताना दिसत आहेत. ते कलर्स मराठी वाहिनीवरील 'अशोक मा.मा.' या मालिकेत काम करताना दिसत आहेत.

Ashok Ma.Ma.'s second innings has begun in the new year with his grandchildren! | नातवंडांसह नव्या वर्षात सुरु झालीय अशोक मा.मा. यांची सेकंड इनिंग!

नातवंडांसह नव्या वर्षात सुरु झालीय अशोक मा.मा. यांची सेकंड इनिंग!

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) सध्या छोट्या पडद्यावर काम करताना दिसत आहेत. ते कलर्स मराठी वाहिनीवरील 'अशोक मा.मा.' (Ashok Ma.Ma.) या मालिकेत काम करताना दिसत आहेत. एक वेगळा विषय, उत्तम कलाकारांचा संच, उत्कृष्ट लेखन आणि अर्थातच अशोकमामांमुळे मालिका सुरु होताच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.  मालिकेतील इतर महत्वाचे कलाकार रसिका वाखारकर, नेहा शितोळे, आणि बच्चे कंपनी यांनी देखील आपल्या कामाने सर्वांची मने जिंकली. 

रिटायरमेंटच्या वयात असलेले अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे असे अशोक मा. मा.च्या एकाकी आयुष्यात आयुष्यात एक असं वादळ आलं ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्य ढवळून निघालं. मुलाच्या आणि सुनेच्या अकाली मृत्युंनतर आता नातवंडांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली आहे आणि यातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे भैरवी. मालिकेमध्ये येत्या आठवड्यात अशोक मा.मा. आणि मुलांचे बदलेले नाते व बदलत जाणारं नातं, त्यांच्या नात्यातील कंगोरे आणि मामांची एक वेगळीच बाजू बघायला मिळणार आहे. एकीकडे त्यांनी स्वीकारलेली जबाबदारी आणि त्यासाठी आजच्या काळाशी जुळवून घेण्यासाठी मामांचे प्रयत्न, जॉब मिळविण्याची सुरु असलेली धडपड आणि दुसरीकडे मामांचे नातवंडांसह नातं बघायला मज्जा येणार आहे. 

आजोबांचं प्रेम अनुभवयला मिळतंय- निया पवार

इरा म्हणजेच निया पवार म्हणाली, अशोक मामांसोबत काम करायला मिळणे हे तर माझं भाग्य आहे. मामांकडून रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. अशोक मा.मा. ह्या मालिकेत अशोक मामा हे माझे आजोबा आहेत आणि आम्हा तिन्ही भावंडांमध्ये मी त्यांची लाडकी नात आहे. खऱ्या आयुष्यात मी कधीच आजोबांचं प्रेम अनुभवलं नव्हतं पण अशोक मा.मा. निमित्ताने आजोबांचं प्रेम अनुभवयला मिळालं ते ही अशोक मामा हे आजोबा हे मी माझं भाग्य समजते. खूप वेळा आजोबांसोबत सीन करताना सीन छान झाला की ते डोक्यावरती हात ठेवून बोलतात "पिल्लू खूप छान सीन केलास" आणि मामांकडून आपल्या कामाचं कौतुक होणं म्हणजे मी केलेल्या कामाची पोचपावती मिळण्यासारखंच आहे.”

अशोक सराफ यांच्यासोबत काम करायला येते मज्जा- शुभवी

तर संयमी म्हणजेच शुभवी गुप्ते  म्हणाली ,"मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण मला माझा पहिला शो अशोक सराफ यांच्यासोबत करायला मिळाला. आम्हाला रोज नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. ऑनस्क्रीन जेवढी काळजी ते घेतात आमची तेवढीच ऑफस्क्रीन काळजी पण घेतात. खूप मज्जा येते मला त्यांच्याबरोबर काम करताना." 

मी स्वतःला भाग्यवान समजतो- स्वराज पवार

पुढे ईशानचं पात्र करणारा स्वराज पवार म्हणाला, "आजोबांसोबत सुरूवातीपासूनच माझं नातं हे खोडकर,खट्याळ असल्यामुळे हे सारखे मला ओरडतात आणि तेवढंच त्यांचं माझ्यावर प्रेम सुद्धा आहे. आता जी आमची सेकंड इनिंग सुरू झाली आहे तिथे माझा आणि आजोबांचं नातं हळूहळू खुलत चाललं आहे. ऑफस्क्रीन सीन करताना ते आम्हाला समजावून सांगतात की सीन कशाप्रकारे करावे. अशोक सराफ यांच्यासोबत काम करायला मिळत आहे, त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.

Web Title: Ashok Ma.Ma.'s second innings has begun in the new year with his grandchildren!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.