अशोक सराफ पाहतात फक्त 'ही' मालिका, मराठी अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 03:57 PM2024-07-10T15:57:44+5:302024-07-10T15:58:23+5:30

मालिकेतील मुख्य अभिनेत्रीनेच अशोक सराफ यांची भेट घेत याचा खुलासा केला आहे.

Ashok Saraf watches only one marathi serial lead actress Rasika Wakharkar shares post | अशोक सराफ पाहतात फक्त 'ही' मालिका, मराठी अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत केला खुलासा

अशोक सराफ पाहतात फक्त 'ही' मालिका, मराठी अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत केला खुलासा

मराठीतील सुपरस्टार अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचे लाखो चाहते आहेत. सेलिब्रिटीही त्यांचं काम पाहून प्रेरणा घेतात. अशोक सराफ टीव्हीवर नक्की कोणती मालिका पाहतात माहितीये का? मालिकेतील मुख्य अभिनेत्रीनेच अशोक सराफ यांची भेट घेत याचा खुलासा केला आहे. एवढे मोठे अभिनेते फक्त आपली मालिका पाहतात हे कळल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

'कलर्स मराठी' वाहिनीवर अनेक मालिकांचं प्रसारण होत आहे. पण त्यात अशोक सराफ एकच मालिका पाहतात ती म्हणजे 'पिरतीचा वनवा उरी पेटला'. या मालिकेतील मुख्य अभिनेत्री रसिका वाखरकरने (Rasika Wakharkar) नुकतीच अशोक सराफ यांची घरी जाऊन भेट घेतली.  त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या तसंत मालिकेचा एपिसोडही पाहिला. 

रसिकाने सोशल मीडियावर अशोक सराफ यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले, "मी कधीच सीरियल पाहत नाही...पण तुमची सीरियल मी न चुकता रोज बघतो - अशोक सराफ 
बास! काय हवंय अजून? काल त्यांना पहिल्यांदा भेटण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आणि इतकंच नाही तर त्यांच्यासोबत आमच्या मालिकेचा एपिसोड बघण्याचा योग आला. अविस्मरणीय दिवस!"

विशेष म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधानने रसिका आणि मालिकेतील मुख्य अभिनेता इंद्रनील कामत यांची भेट घडवून आणली.  रसिकाने तेजश्रीचे पोस्टमधून आभारही मानले आहेत. चाहत्यांनी कमेंट करत रसिकाचं अभिनंदन केलं आहे.

Web Title: Ashok Saraf watches only one marathi serial lead actress Rasika Wakharkar shares post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.