आशुतोष गोखलेच्या पायला झाली गंभीर दुखापत, तरीही सुरु ठेवणार 'रंग माझा वेगळा'चं शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 03:45 PM2022-02-05T15:45:32+5:302022-02-05T16:30:33+5:30
आशुतोषने इन्स्टा स्टोरीच्या माध्यामातून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत येणाऱ्या ट्विस्टमुळे पुढे काय घडणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. या मालिकेत दिपाची भूमिका रेश्मा शिंदे साकारतेय तर कार्तिकची भूमिका आशुतोष गोखले. आशुतोष मालिकेत डॉ. कार्तिक इनामदारची भूमिका साकारतो आहे. दिपा आणि कार्तिक दोघांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडतायेत म्हणून गेल्या काही आठवड्यांपासून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये नंबर वन आहे.
सोशल मीडियावरही आशुतोषचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यात त्याच्या चाहत्यांनाही प्रचंड रस असतो. कार्तिकने इन्स्टा स्टोरीच्या माध्यामातून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. कार्तिकच्या पायाला दुखापत झाल्याची पाहून त्याचे चाहते चिंतेत होते मात्र त्याने चाहत्यांना प्रोमिस केलाय की, तो 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या शूटिंगमधून ब्रेक घेणार नाही. आशुतोषला लवकर बरं वाटेल अशी आशा त्याचे चाहते करतायेत.
एकांकिकामध्येही केलंय काम
आशुतोषला महाविद्यालयीन जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. त्यावेळी अनेक एकांकिकामध्ये त्याने सहभाग घेतला होता. संगीत कोणे एके काळी, बत्ताशी, सवाई यासारख्या एकांकिकेचे सादरीकरण केले. त्यापैकी बत्ताशी या एकांकिकेला उत्कृष्ट एकांकिकेचे पारितोषिक मिळालं. 'भाऊचा धक्का', 'युनो' यासारख्या शॉर्ट फिल्मचाही तो भाग बनला.
आशुतोष आहे अभिनेता विजय गोखले यांचा मुलगा
'ओ वुमनिया', 'डोन्ट वरी बी हॅपी' आणि भरत जाधवसोबत 'मोरूची मावशी' या नाटकातही त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. आशुतोषने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.त्यामुळे आशुतोषच्या रक्तातच अभिनय आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणा नाही. त्याचे वडिल हे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत.विजय गोखले यांचा आशुतोष हा लेक. विजय गोखले यांनी विविध मालिका, नाटक आणि सिनेमांमधून रसिकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. त्यांची भूमिका असलेली 'श्रीमान श्रीमती' ही मालिका छोट्या पडद्यावर तुफान हिट ठरली. या मालिकेतील भूमिकेमुळे ते घराघरात जाऊन पोहोचले.