अग्गं बाई सासूबाई मालिकेतील बबड्या करतोय या गोष्टीला मिस !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 10:08 AM2020-04-27T10:08:44+5:302020-04-27T10:10:00+5:30
स्वत:च्या हेल्थकडे लक्ष देतोय. या मोकळ्या वेळेत आपण अनेक छान वेब सिरीज किंवा चित्रपट बघू शकतो. मी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चित्रपट बघतो. हे माझं क्वारंटाईनचं शेडय़ुल बनलंय.
देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व टेलिव्हिजन शोचे शूटिंग थांबले आहे. याकाळात सारेच कलाकारा घरात आपल्या कुटुंबासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहेत. अभिनेत आशुतोष पत्कीदेखील वेगवेगळ्या गोष्टी करत रसिकांचे सोशल मीडियाद्वारे मनोरंजन करत आहे.
‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. तसेच अल्पावधीतच या मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी रसिकांची मनं जिंकली यात ‘सोहम’ ही व्यक्तीरेखा साकारणारा आशुतोष पत्की सगळ्यांत जास्त भाव खावून गेला. या मालिकेमुळे आशुतोष प्रकाशझोतात आला. त्याच्याविषयी रसिकांच्या मनात प्रचंड राग असला तरीही तो त्याच्या ख-या आयुष्यात कसा आहे. हे जाणून घेण्याचीही रसिकांना उत्सुकता असते. लॉकडाऊन सुरू असल्यामुळे मालिकांचे शूटिंग बंद आहे. तो कसा वेळ घालवतोय हे जाणून घेण्यासाठी अनेकजण त्याच्या सोशल मीडिया पेजवर त्याला प्रश्न विचारताना दिसतात. तसेच तो काय काय करतोय याविषयी व्हिडीओ बनवत माहिती चाहत्यांसह शेअर करत आहे.
आता दुसरे लॉकडाउन सुरू झाले आहे. नेहमीचे काम बंद असल्यामुळे तो त्याच्या मालिकेच्या टीमला सर्वात जास्त मिस करतोय. मालिका सुरू झाल्यापासून त्याच्या कुटुंबापेक्षा त्याने मालिकेच्या कालाकारांसह अधिक वेळ घालवला त्यामुळे त्याला आता त्याचे शूटिंगचे दिवस आठवत आहेत. सेटवर कलाकारंसह सुरू असलेली मजा मस्ती त्याला आठवत आहे. अग्गंबाई सासूबाई’ मालिकेची संपूर्ण टीम माझं परिवारच आहे. त्यामुळे त्यांना खूप मिस करतोय. सगळे सेटवर माझी खूप काळजी घ्यायचे. निवेदिता ताई माझ्यासाठी खूप छान छान रेसिपीज बनवायच्या. आम्ही सगळे व्हिडीओ कॉलवरून टचमध्ये आहोत. दिवसातून १३ ते १५ तास आम्ही शूटिंग करायचो पण आता या सुट्टीमुळे सगळे निवांत आहेत असेही त्याने सांगितले.
मी घरी माझा वेळ माझ्या घरच्यांसोबत घालवतोय. या मोकळ्या वेळात मी अनेक गोष्टी शिकायचा प्रयत्न करतोय. सध्या मी कूकिंग शिकतोय. वेगवेगळय़ा रेसिपीज मी ट्राय करतोय. घरच्यांना त्यांच्या कामात मदत करतोय, स्वत:च्या हेल्थकडे लक्ष देतोय. या मोकळ्या वेळेत आपण अनेक छान वेब सिरीज किंवा चित्रपट बघू शकतो. मी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चित्रपट बघतो. हे माझं क्वारंटाईनचं शेडय़ुल बनलंय.