अश्विनी कासार दिसणार पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 07:00 PM2018-11-10T19:00:00+5:302018-11-10T19:00:00+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अश्विनी कासार पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Ashwini Kasar will be seen As Hirabai Pednekar | अश्विनी कासार दिसणार पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्या भूमिकेत

अश्विनी कासार दिसणार पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्या भूमिकेत

googlenewsNext

सोनी मराठी वाहिनीवरील गर्जा महाराष्ट्र या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या कार्यक्रमातील आगामी भागात छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अश्विनी कासार दिसणार आहे. ती पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याबाबतची माहिती खुद्द अश्विनीने सोशल मीडियावर दिली आहे.

अश्विनीने गर्जा महाराष्ट्र कार्यक्रमातील तिचा हिराबाई पेडणेकर यांच्या लूकमधील फोटो शेअर करीत लिहिले की, हिराबाई पेडणेकर महाराष्ट्रातील पहिल्या महिला नाटककार. त्यांची भूमिका मी साकारत आहे सोनी मराठी वाहिनीवरील "गर्जा महाराष्ट्र" या कार्यक्रमात. तेव्हा भेटूया शनिवारी रात्री ९.३० वाजता... फक्त सोनी मराठी वर!


तसेच अश्विनीने आगामी भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहिले की, “जयद्रथ विडंबन" हे स्वरचित नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी धडपडणाऱ्या हिराबाई पेडणेकर. पुन्हा एकदा दशमी क्रिएशन्स सोबत आणि पहिल्यांदाच सोनी मराठी वर या भूमिकेच्या निमित्ताने आपल्या भेटीस मी येत आहे. 

अश्विनी या कार्यक्रमाच्या सेटवरील कलाकारांसोबतचे फोटोदेखील शेअर केला आहे आणि नाटकावर प्रेम असलेल्याना नाटककारांची भूमिका साकारण्याची संधी मिळते आहे. दश्मी क्रिएशन्सचे आभार अश्विनीने मानले आहेत.
अश्विनीने छोट्या पडद्यावरील विविध भूमिका सक्षमपणे साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तिची कमला ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. आता ती हिराबाई पेडणेकरांची भूमिकेत रसिकांसमोर येण्यासाठी खूप उत्सुक असून तिला या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Ashwini Kasar will be seen As Hirabai Pednekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.