डोंगर-दऱ्यांमध्ये हरवून गेलीये 'तू चाल पुढं'ची अश्विनी; नैनीतालमधले निवडक फोटो केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 16:24 IST2024-06-05T16:23:30+5:302024-06-05T16:24:00+5:30
Deepa Chaudhari: दिपाने तिच्या बिझी शेड्युलमधून तिच्या लेकासाठी वेळ काढला असून सध्या ही मायलेकाची जोडी त्यांचं व्हेकेशन एन्जॉय करत आहेत.

डोंगर-दऱ्यांमध्ये हरवून गेलीये 'तू चाल पुढं'ची अश्विनी; नैनीतालमधले निवडक फोटो केले शेअर
छोट्या पडद्यावर असंख्य मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. परंतु, काही मालिका या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'तू चाल पुढं'. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं. विशेष म्हणजे तू चाल पुढंच्या माध्यमातून बऱ्याच वर्षानंतर अभिनेत्री दिपा परब-चौधरी हिने मराठी कलाविश्वात पुन्हा पदार्पण केलं. त्यामुळे ही मालिका तिच्यासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी खास होती. परंतु, मालिका संपल्यानंतर ती सध्या काय करतीये असा प्रश्न अनेकांना पडतो.
मालिका संपल्यानंतर दिपा 'बाईपण भारी देवा' या सिनेमात झळकली. विशेष म्हणजे हा सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. त्यामुळे दिपा सातत्याने चर्चेत येत आहे, यामध्येच ती तिच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. सध्या दिपा तिच्या कुटुंबासह नैनीतालमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिपाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती तिच्या लेकासोबत प्रिन्ससोबत दिसून येत आहे.