अस्ताद काळेने प्रेमाची कबुली दिल्यानंतर इतक्या महिन्यांनी स्वप्नाली पाटीलने दिला होता होकार, अशी आहे त्यांची लव्हस्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 03:19 PM2021-02-02T15:19:29+5:302021-02-02T15:21:37+5:30

अस्ताद आणि स्वप्नालीची लव्हस्टोरी अतिशय फिल्मी आहे.

Astad Kale and swapnali patil love story | अस्ताद काळेने प्रेमाची कबुली दिल्यानंतर इतक्या महिन्यांनी स्वप्नाली पाटीलने दिला होता होकार, अशी आहे त्यांची लव्हस्टोरी

अस्ताद काळेने प्रेमाची कबुली दिल्यानंतर इतक्या महिन्यांनी स्वप्नाली पाटीलने दिला होता होकार, अशी आहे त्यांची लव्हस्टोरी

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक वर्षांपूर्वी एका मालिकेचा पायलट एपिसोड शूट करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात अस्ताद आणि स्वप्नाली दोघे भाऊ-बहीण होते. त्यानंतर जवळजवळ तीन-चार वर्षांनी दोघांनी पुढचे पाऊल या मालिकेत काम केले.

मराठी बिग बॉसमधून अभिनेता अस्ताद काळेची लव्हस्टोरी जगासमोर आली. अभिनेत्री स्वप्नाली पाटीलसोबतच्या रिलेशनशिपची कबुली त्याने बिग बॉस मराठीमध्ये दिली होती आणि आता ते दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या केळवणाचे फोटो नुकतेच सोशल मीडियाावर व्हायरल झाले होते. 

अस्ताद आणि स्वप्नालीची लव्हस्टोरी अतिशय फिल्मी आहे. त्यानेच याविषयी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. अनेक वर्षांपूर्वी एका मालिकेचा पायलट एपिसोड शूट करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात अस्ताद आणि स्वप्नाली दोघे भाऊ-बहीण होते. त्यानंतर जवळजवळ तीन-चार वर्षांनी दोघांनी पुढचे पाऊल या मालिकेत काम केले. या मालिकेत स्वप्नालीची एंट्री झाल्यानंतर या दोघांची मैत्री झाली आणि काहीच महिन्यात अस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला. अस्तादने स्वप्नालीला प्रपोज केले नाही. मात्र मनात काय हे बोललेच पाहिजे असा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे स्वप्नालीला त्याने तू मला आवडतेस असे सांगितले. त्यावर या गोष्टीचा विचार करू दे असे उत्तर स्वप्नालीने त्याला दिलं आणि त्यानंतर जवळजवळ वर्षभरानंतर होकार कळवला होता.

अस्तादने त्याच्या प्रेमाची कबुली बिग बॉस मराठीत दिली, त्यावेळी स्वप्नाली तिच्या कुटुंबियांसोबत हा कार्यक्रम पाहात होती. यावर तिच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया काय होती यावर स्वप्नाली सांगते, मी आणि आस्ताद हे चांगले मित्रमैत्रीण असल्याचे माझ्या घरातल्यांना माहीत होते. पण मैत्रीपेक्षा आमच्यात अधिक काही आहे याची कल्पना त्यांना नव्हती. माझ्या आईला थोडासा संशय होता. पण वडिलांना काहीच माहीत नव्हते. हा भाग आम्ही घरातील सगळे मिळून पाहात होतो. हा कार्यक्रमात माझ्याविषयी बोलेल याची मला थोडीदेखील कल्पना नव्हती. त्याने कार्यक्रमात कबूल केल्यानंतर माझ्या वडिलांनी फक्त माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिले आणि बोलव आता त्याला भेटायला असे ते म्हणाले....

Web Title: Astad Kale and swapnali patil love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.