मालिकांमध्ये बाप्पांच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 05:37 AM2017-08-29T05:37:37+5:302017-08-29T11:07:46+5:30

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंनदाचे, जल्लोषाचे वातावरण आहे कारण एकच आपल्या सगळ्यांचाच लाडका गणपती बाप्पा याचे आगमन झाले आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या ...

The atmosphere of enthusiasm by the arrival of the bats in the series | मालिकांमध्ये बाप्पांच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण

मालिकांमध्ये बाप्पांच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण

googlenewsNext
पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंनदाचे, जल्लोषाचे वातावरण आहे कारण एकच आपल्या सगळ्यांचाच लाडका गणपती बाप्पा याचे आगमन झाले आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या सरस्वती आणि घाडगे & सून  या कार्यक्रमांमध्ये देखील गणपतीचे आगमन झाले आहे. 

सरस्वती मालिकेमध्ये भैरव करांच्या वाड्यावर गणेशाचे आगमन झाले आहे. यावेळेसच्या गणेश चतुर्थीमध्ये काही विशेष असणार आहे. “एक गावं एक गणपती” असे आयोजन करण्यात आले आहे. गावामध्ये गणपतीचे जल्लोषात आगमन झाले आहे, पण या गणेशोत्सवामध्ये सरस्वतीवर कोणते नवे संकंट येणार आहे, त्यामधून ती कशी मार्ग काढणार आहे ? राघव या मध्ये तिला काही मदत करणार का ? हे बघण्यासाठी नक्की बघा सरस्वती. 

घाडगे & सून या मालिकेमध्ये देखील गणरायाचे आगमन झाले आहे. घाडगे परिवाराने गणेशाच्या मूर्तीची स्थापना पारंपरिक पद्धतीने करण्यात आली आहे. गणपती आगमनाच्या शुभमुहूर्तावर माईना आणि घाडगे परिवाराला आवडलेली अमृता पहील्यांदाच घाडगेच्या घरी येणार आहे आणि दुसरीकडे अक्षयचे जिच्यावर प्रेम आहे ती कियारा देखील येणार आहे या दोघी माईसमोर आल्यावर त्यावर माईची काय प्रतिक्रिया असेल हे बघणे रंजक असणार आहे. गणरायाकडे सगळेच काहीना काही मागण मागतात त्याचप्रमाणे घाडगे परिवारातील प्रत्येकाने बाप्पाकडे मागण मागितल आहे आता कोणाचे मागण बाप्पा ऐकेल, कोणाची इच्छा पूर्ण होईल हे आपल्याला लवकरच कळेल. 

Web Title: The atmosphere of enthusiasm by the arrival of the bats in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.