अखेर अतुल परचुरेंनी त्या वादग्रस्त वक्तव्याबाबत मागितली माफी, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 04:50 PM2021-04-27T16:50:02+5:302021-04-27T16:53:45+5:30

अखेर अतुल यांनी सोशल मीडियावर जनतेची जाहीरपणे माफी मागितली आहे. व्हिडीओत त्यांनी आपली बाजुही मांडली आहे.

Atul Parchure finally apologize for the incident in Maharashtrachi Hasya Jatra Show, know the reason | अखेर अतुल परचुरेंनी त्या वादग्रस्त वक्तव्याबाबत मागितली माफी, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

अखेर अतुल परचुरेंनी त्या वादग्रस्त वक्तव्याबाबत मागितली माफी, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

googlenewsNext

अभिनेता अतुल परचुरे यांनी हिंदी-मराठी सिनेमात, नाटकात अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या आहेत. आपल्या विनोदी ढंगाने रसिकांचे मनं जिंकणा-या अतुल परचुरे सध्या एका कारणामुळे चर्चेत आले आहेत.छोट्या पडद्यावरील एका या कार्यक्रमात अतुल परचुरे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाईल होळकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.अतुल परचुरे यांच्या विधानानंतर धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. अखेर अतुल यांनी सोशल मीडियावर जनतेची जाहीरपणे माफी मागितली आहे.

व्हिडीओत त्यांनी आपली बाजुही मांडली आहे. त्यांनी म्हटले की, पु.लंच्या 'व्यक्ती आणि वल्ली' पुस्तकातील बापु काने ही व्यक्तीरेखा सादर करताना त्या पात्राच्या तोंडी असलेले ते संवाद होते. पात्र वाचून दाखवणे इतकाच माझा उद्देश होता.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा उल्लेख हा मुळ पुस्तकात पु.लं देशपांडे यांनी केला होता.कुणाच्याही भावना दुखवायचा आमचा हेतू अजिबात नव्हता. 

पुण्यश्लोक अहिल्याबाई आम्हाला वंदनीय आहेत. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी जाहीर दिलगीरी व्यक्त करतो. अतुल परचुरे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेची जाहिर माफी मागितली.

 

हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनीही भरभरुन कमेंट करत म्हटले आहे की, तुम्ही मोठ्या मनाने Video मध्ये माफी मागुन खुप चांगले काम केले आहे 🙏🏻मला माहीत आहे तुम्ही खुप चांगले अभिनेता असुन एक चांगले व्यक्ती देखील आहात🙏🏻आणि तुम्ही वाईट वाटुन घेऊ नका😇आणि परत अशी चुक करू नका, तर एकाने लिहीले आहे की, तुम्ही त्या लाइव कार्यक्रमात माफी मागावी आणि तुमची सगळी टीम हसत होती त्या सर्वानी जाहीरपणे माफी मागावी........आणि ह्यापुढे असे होणार नाही याची कळजी घ्या.

अतुल परचुरे म्हणतो, विनोदी अभिनेत्याने या गोष्टीचा भान ठेवायला हवा

"विनोदी अभिनेत्याला समाजाचे भान असायला हवे. कारण त्याशिवाय विनोदाची जाण निर्माण होत नाही. लेखकाने लिहिलेले विनोद अभिनेत्यापर्यंतच पोहचले नाही तर प्रेक्षकांपर्यंत तो काय पोहचवणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे अभिनेत्याने सजग असायला हवे. बऱ्याचदा चित्रीकरणादरम्यान संहितेच्या पलीकडचे अनेक विनोद हे ओघाओघाने येऊनही जातात आणि प्रसंगाला अजूनच मजा येत जाते.

Web Title: Atul Parchure finally apologize for the incident in Maharashtrachi Hasya Jatra Show, know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.