'तू अशी जवळी रहा' मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये वाढतेय उत्कंठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 07:15 IST2018-09-28T15:07:11+5:302018-09-29T07:15:00+5:30

'तू अशी जवळी रहा' या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Audience will excite about Tu Ashi Javali Raha Tv Series | 'तू अशी जवळी रहा' मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये वाढतेय उत्कंठा

'तू अशी जवळी रहा' मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये वाढतेय उत्कंठा

ठळक मुद्दे'तू अशी जवळी रहा' या मालिकेत तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके'तू अशी जवळी रहा' या मालिकेत वेड्या प्रेमाची कथा


झी युवा या वाहिनीने नेहमीच आपल्या प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन मालिकांचे सादरीकरण केले आहे आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण कथांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन देखील केले आहे. झी युवा वाहिनीच्या प्रेक्षकांची ऑक्टोबर महिन्याची सुरुवात देखील तितक्याच धमाकेदारपणे होणार आहे. कारण झी युवा आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी 'तू अशी जवळी रहा' आणि 'सूर राहू दे' अशा दोन नवीन आणि वेगळ्या विषयाच्या मालिका सादर करणार आहे. दोन्हीही मालिका तितक्याच वेगळ्या आणि रंजक दिसत आहेत.

'तू अशी जवळी रहा' या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नावाप्रमाणे ही मालिका एक परिकथेतील प्रेमकथा नसून ही कथा आहे वेड्या प्रेमाची. मालिकेत सिद्धार्थ बोडके राजवीर मोहिते पाटीलची भूमिका निभावणार आहे जो एक अत्यंत चाणाक्ष मुलगा आहे ज्याला पराभव मान्य नाही आणि दुसरीकडे तितिक्षा तावडे ही मनवाची व्यक्तिरेखा साकारणार आहे,  जी एक स्वतंत्र आणि स्वावलंबी मुलगी आहे. ही बाकीच्या प्रेमकथांपेक्षा थोडी वेगळी कहाणी आहे. एकमेकांच्या विरुद्ध स्वभाव असणारे हे दोघे प्रेमासाठी त्यांची तत्व बाजूला करू शकत नाहीत. ही कथा राजवीरचं मनवावर असलेल्या वेड्या प्रेमाची तर आहेच पण मनवा त्याच्या वेड्या प्रेमाला कसं जिंकणार याने मालिकेला वेगळी कलाटणी मिळणार आहे.

मालिकेचे २ प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आले. एका प्रोमोत प्रेम व्यक्त करताना बायको आपण दुखावतोय याचे भान नसलेला तर दुसऱ्या प्रोमोमध्ये आपल्या पत्नीवर फक्त आपलाच हक्क आहे असा बजावणाऱ्या मानसिंगला पाहूनप्रेक्षकांच्या अंगावर काटा आला. मालिकेच्या प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोजनी प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्कंठा शिघेला नेली आहे. अशा प्रकारची मालिका आणि विषय प्रथमच हाताळण्यात येत आहे आणि या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत हे त्यांच्या प्रोमोजला मिळालेल्या प्रतिसादावरून कळते. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंकाच नाही.

Web Title: Audience will excite about Tu Ashi Javali Raha Tv Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.