सुयश टिळक आणि पल्लवी पाटील सोबत होणार या कार्यक्रमासाठी ऑडीशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 05:11 AM2018-05-18T05:11:00+5:302018-05-18T10:41:00+5:30

नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे मधील स्पर्धकांच्या अभूतपूर्व प्रतिसादांनंतर झी युवाची संगीत सम्राटाची टीम आता कला आणि संस्कृतीने बहरलेल्या आणि ...

Audition for this program will be held with Suyash Tilak and Pallavi Patil! | सुयश टिळक आणि पल्लवी पाटील सोबत होणार या कार्यक्रमासाठी ऑडीशन!

सुयश टिळक आणि पल्लवी पाटील सोबत होणार या कार्यक्रमासाठी ऑडीशन!

googlenewsNext
गपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे मधील स्पर्धकांच्या अभूतपूर्व प्रतिसादांनंतर झी युवाची संगीत सम्राटाची टीम आता कला आणि संस्कृतीने बहरलेल्या आणि मर्दानी खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या रांगड्या कोल्हापूर मध्ये दाखल झाली आहे. कोल्हापूरकर नेहमीच कलेची कदर करतात आणि त्यामुळेच कोल्हापूरमध्ये होणाऱ्या संगीत सम्राट पर्व २ या कार्यक्रमाच्या ऑडिशनला कोल्हापूरकर कल्ला करतील अशी खात्री टीमला आहे.या ऑडिशन शनीवार १९ मे ला सकाळी ८ ते दुपारी २ या दरम्यान येथे होणार आहे. ज्या प्रमाणे इतर शहरांमधील गुणी स्पर्धक निवडले गेले त्याचप्रमाणे कोल्हापूर कलेची योग्य पारख करून झी युवा निवड प्रक्रिया पूर्ण करेल. 'संगीत सम्राट' पर्व २ चे ऑडिशन कोल्हापुर शहरात सकाळी ८ वाजता विबग्योर हायस्कुल, आर एस ३०१ ए, मुडशिंगी रोड, उचगाव, कोल्हापूर , महाराष्ट्र ४१६००५ येथे होणार आहेत.या ऑडिशनसाठी कोल्हापूर ची लोकप्रिय मालिका 'बापमाणूस' मधील सूर्या आणि निशा म्हणजेच आपले आवडते कलाकार सुयश तिळक आणि पल्लवी पाटील हे सुद्धा सहभागी होणार आहेत.

 

महाराष्ट्रातील अनेक होतकरू गायक आणि संगीतकार त्यांना मिळणाऱ्या प्रत्येक संधीच सोने करण्याची वाट पाहत असतात. मात्र अशा संधी फार कमी येतात. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी संगीत सम्राट या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला अतिशय उस्फुर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील संगीत आणि गायकी क्षेत्रातील कलाकारांना एक वेगळा दर्जा मिळाला. गाण्यांवर आधारित रिअॅलिटी शोच्या या गर्दीत 'संगीत सम्राट' या आगळ्या वेगळ्या म्युजिक रिअॅलिटी कार्यक्रमाने स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे.नव्या स्वरूपातील ‘संगीत सम्राट पर्व २' एका वेगळ्या स्तरावर सुरु होणार आहे. या पर्वामध्ये संगीतमय माणसाचा शोध आणि माणसातील संगीताचा शोध घेतला जाणार आहे पण एका नव्या आणि वेगळ्या पद्धतीने.  या कार्यक्रमात केवळ गाणे गायचे नाही तर संगीत सम्राट हा कार्यक्रम अशा कलाकारांसाठी आहे जे कोणत्याही वाद्यापासून वस्तूपासून सुमधुर संगीत बनवू शकतील. तमाम मराठी प्रेक्षकांना स्वतःत असलेले संगीतगुण जगासमोर आणण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे.'संगीत सम्राट पर्व २' या स्पर्धेला जसे वयाचे बंधन नाही तसेच विशिष्ट संगीतप्रकाराचे बंधन नसेल. यात तुम्ही एकटे, जोडीदारासोबत किंवा पूर्ण ग्रुपसोबतही सहभागी होऊ शकता. गायन, वाद्य वाजवणे तसेच बँड परफॉर्मन्स सादर करणे हे या शोचे वैशिष्ट्य असेल. यात सहभागी होण्यासाठी कोणतेही बंधन नसल्याने उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे.

Web Title: Audition for this program will be held with Suyash Tilak and Pallavi Patil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.