'मावशीनं आयुष्यातले लै भयान चढउतार पचवलेत', किरण मानेंनी मावशीसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 02:00 PM2023-06-24T14:00:04+5:302023-06-24T14:00:35+5:30

अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे किरण माने (Kiran Mane). सिनेइंडस्ट्रीसह समाजात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर ते उघडपणे व्यक्त होत असतात.

'Aunt has digested the ups and downs of life', Kiran Mane's post for aunt is in discussion | 'मावशीनं आयुष्यातले लै भयान चढउतार पचवलेत', किरण मानेंनी मावशीसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

'मावशीनं आयुष्यातले लै भयान चढउतार पचवलेत', किरण मानेंनी मावशीसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

googlenewsNext

अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे किरण माने (Kiran Mane). सिनेइंडस्ट्रीसह समाजात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर ते उघडपणे व्यक्त होत असतात. इतकेच नाही तर ते बऱ्याचदा त्यांच्या जीवनात घडणारे किस्से, गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करतात. यावेळी त्यांनी त्यांच्या फलटणच्या मावशीसाठी स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता किरण मानेने मावशीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, ...माझी फलटनची सुलामावशी ! ल्हानपनीपास्नं मी लै लाडका तिचा...अजूनबी कुठल्या लग्नसमारंभात आली की, "माझा किरन्या कुठंय..माझा किरन्या कुठंय." करत शोधत येती... ल्हानपनी सुट्टीत मी फलटनला गेलो की म्हैना-म्हैनाभर तिच्याकडंच असायचो... आबा आनि मावशीचं मला कुठं ठिवू आन् कुठं नको असं हुयाचं... मुलखाचं लाड करून घेतलं मी मावशीच्या राज्यात.

पन माझी मावशी नाय बदलली..

त्यांनी पुढे म्हटले की, ...माझ्या मावशीनं आयुष्यातले लै भयान चढउतार पचवलेत भावांनो. तरूणपणी टोकाचं वैभव आनि ऐश्वर्य अनुभवलं आणि पोरं मोठी होता-होता जीवघेनी गरीबी, अपार दु:ख, भयान संकटांचाबी सामना केला. पन कुठल्याही क्षनी मावशी मला हतबल - निराश दिसली नाय.. येईल त्या परीस्थितीला हिमतीनं आनि हसतमुखानं तोंड दिलं... लै खमकी आनि जबराट हाय माझी मावशी ! माझ्यावर तिचीच सावली हाय... आज मावशीला पुन्हा सगळं ऐश्वर्य लाभलंय.. परिस्थिती बदलत र्‍हायली पन माझी मावशी नाय बदलली.. जश्शी पूर्वी होती तश्शीच अजूनबी हाय..

दोन वर्षांत दोन वेळा नातींच्या लग्नात भेटली मावशी

या दोन वर्षांत दोन वेळा नातींच्या लग्नात भेटली. दोन्ही वेळा आधीच फोन आलावता.. "किरन्या..येनार हायेस ना लग्नाला? शुटिंग फिटींगची कारनं सांगीतलीस तर बघच. किती दिस झालं भेटला न्हाईस." मी म्हन्ल, "येनारय गं. तुला भेटायसाठीच तर सुट्टी काढली.." ..भेटल्यावर मिठी मारुन, तोंडावरनं मायेनं हात फिरवत, कानशीलावर बोटं मोडत म्हन्ली, "रोज टी.व्ही.त बघती तुला.. नातींना सांगती ए पोरींनो मला किरन्याचा पोग्राम लावून द्या.. त्या लावत्यात मग. फलटनमधल्या वळखीच्या बायका म्हन्त्यात 'त्यो बिगबाॅसमधला किरन माने तुमचा पावना हाय व्हय? आधी एका मालिकेत इलास पाटील झाल्याला?' मी म्हन्ती, 'आवो पोरगा हाय माझा.' त्यास्नी खरंच वाटत नाय. आज फोटू काढ आपला म्हंजी दाखवीन सगळ्यांना..", असे किरण माने म्हणाले.


फोटो काढताना हळूच मला म्हन्ली, "मला वाटायचं पोरगं वाया गेलं नाटकाच्या नादानं.. आता काय हाताला लागत नाय.. लै काळजी वाटायची तुझी.. पन आज तुझं नांव झालेलं बघून जीवाला बरं वाटतं. अजून लै मोठ्ठा हो. कष्टाला कमी पडू नकोस. कुनी तुझ्या पोटावर पाय आनला तरी त्याचं वाईट चिंतू नकोस. तुझ्या बापासारखा निर्मळ मनाचा र्‍हा. हरीबुवा तुला काय बी कमी पडू देनार नाय. आ हितनं फुडचं तुझं यश बघायला मी र्‍हाती का नाय कुनाला ठावं.."... मला कसंतरीच झालं. डोळ्यातलं पानी लपवत हसत म्हन्लो, "मावशे, काय धाड भरनाय नाय तुला. लै जगनार हायस तू.." मावशी कसंनुसं हसली.. माझ्या काळजात उगीचंच कालवाकालव झाली.. 'मावशी' ही गोष्टच नादखुळा निर्मान केलीय निसर्गानं गड्याहो ! लब्यूमावशे. लै लै लै जग. आनंदात रहा. तुला अभिमान वाटंल असंच काम करंल तुझा किरन्या, असे म्हणत किरण मानेंनी पोस्ट शेअर केली आहे.

Web Title: 'Aunt has digested the ups and downs of life', Kiran Mane's post for aunt is in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.