"तुम्ही खूप एन्जॉय करता", अवधूत गुप्तेच्या काश्मीरमधील फोटोवर चाहत्याची कमेंट, रिप्लाय देत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 18:55 IST2023-07-11T18:47:56+5:302023-07-11T18:55:16+5:30
फोटोवर कमेंट करणाऱ्या चाहत्याला अवधूत गुप्तेने रिप्लाय दिला आहे.

"तुम्ही खूप एन्जॉय करता", अवधूत गुप्तेच्या काश्मीरमधील फोटोवर चाहत्याची कमेंट, रिप्लाय देत म्हणाला...
सुमधूर आवाजाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा मराठीतील सुप्रसिद्ध गायक म्हणजे अवधूत गुप्ते. त्याच्या गाण्यांचे लाखो चाहते आहेत. चित्रपट व अल्बममधील गाण्यांबरोबरच अवधूत गुप्तेने अनेक राजकीय पक्षांची गाणीही गायली आहेत. 'ऐका दाजिबा', 'मेरी मधुबाला', 'खंडाळा घाट' यांसारखी अवधूतने गायलेली अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत.
अवधूत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. अवधूतचे हे फोटो काश्मीरमधील आहेत. या फोटोमध्ये पावसाळ्यात खुललेलं काश्मीरचं निसर्गसौंदर्य दिसत आहे. अवधूतने या फोटोला "हिमालयाचा मी तो यात्रिक...मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम?.. विचित्र नेमानेम!!" असं कॅप्शन दिलं आहे.
'बाई, बुब्स आणि ब्रा' पोस्टनंतर हेमांगीला आलेला चाहत्याचा फोन, म्हणाली, "तो बायकोबरोबर..."
अवधूतच्या या फोटोंनी त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या फोटोवर एका चाहत्याने "सर तुम्ही खूप एन्जॉय करता," अशी कमेंट केली आहे. चाहत्याच्या या कमेंटवर अवधूतने रिप्लाय दिला आहे. "काय करू, कंट्रोलच होत नाही," असं अवधूतने म्हटलं आहे.
"आमच्याकडे मासिक पाळी पाळली जात नाही", हेमांगी कवीचं वक्तव्य, म्हणाली, "माझ्या आजीने..."
दरम्यान, अवधूत गुप्ते त्याच्या झी मराठी वाहिनीवरील 'खुपते तिथे गुप्ते' या शोमुळे चर्चेत आहे. त्याच्या या शोमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, संजय राऊत या नेत्यांनी हजेरी लावली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये सहभागी होणार आहेत.