Video: तमिळ अन् मराठीचा तडका, खण आणि पैठणीची टोपी घालून नारकर जोडीने बनवलं रील
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:50 IST2024-09-05T13:50:05+5:302024-09-05T13:50:34+5:30
तमिळ आणि मराठी तडका अशा फ्युजनचं हे रील आहे.

Video: तमिळ अन् मराठीचा तडका, खण आणि पैठणीची टोपी घालून नारकर जोडीने बनवलं रील
अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) ही मराठीतली लोकप्रिय जोडी. दोघंही सोशल मीडियावर त्यांच्या रील्समुळे चर्चेत असतात. डिजीटल माध्यमात आपणही तसंच राहू असं म्हणत त्यांनी रील्स बनवायला सुरुवात केली. दोघंही वेगवेगळ्या मालिकेत काम करत आहेत. शऊट संपवून रात्री घरी आल्यानंतर आम्ही दीड तास रील बनवतो असं अविनाश नारकर म्हणाले होते. अनेकदा ते काही रील्सवरुन खूप ट्रोलही होतात. नुकतंच त्यांनी पोस्ट केलेलं रील चांगलंच व्हायरल होत आहेत.
तमिळ आणि मराठी तडका अशा फ्युजनचं हे रील आहे. ऐश्वर्या नारकर यांनी खणाची टोपी घातली आहे तर अविनाश नारकर यांनी पैठणीची टोपी घातली आहे. दोघंही ही महाराष्ट्रीयन स्टाईल टोपी फ्लॉन्ट करत आहेत. तमिळ आणि मराठी अशा दोन गाण्यांचं फ्यूजन त्यांनी बॅकग्राऊंडला लावलं आहे. दोघांचाही लूक खूपच क्युट दिसतोय. काही मिनिटात त्यांचं हे रील सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
चाहत्यांनी यावर कमेंट करत या जोडीचं कौतुक केलं आहे. 'तुम्ही दोघं सगळ्यांसाठी प्रेरणा आहात' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर तितीक्षा तावडे, सुरुची अडारकर या अभिनेत्रींनीही कमेंट करत कौतुक केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या नारकर यांनी एका ट्रोलरच्या मेसेजचा स्क्रीनशॉटच थेट स्टोरीवर अपलोड केला होता. बरेचदा ऐश्वर्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसतात. त्यांच्या या ताज्या रीलचं मात्र आता कौतुक होतंय.