'रुखी सुखी रोटी तेरे हातो से...', नारकर कपलचा आणखी एक भन्नाट डान्स Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 15:32 IST2024-05-03T15:30:45+5:302024-05-03T15:32:11+5:30
अविनाश नारकर यांचा लूक पाहून नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

'रुखी सुखी रोटी तेरे हातो से...', नारकर कपलचा आणखी एक भन्नाट डान्स Video व्हायरल
अभिनेते अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांचा आणखी एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दोघंही मराठी कलाविश्वातील दिग्गज कलाकार आणि एव्हरग्रीन कप आहे. ट्रेंडिंग रील्स बनवण्यात तर ते नेहमीच पुढे असतात. अनिल कपूरच्या 'नायक' सिनेमातलं रुखी सुखी रोटी... या गाण्यावर नारकर कपलने भन्नाट डान्स केलाय. त्यांच्या या व्हिडिओवर नेटकरीही मजेशीर कमेंट्स करत आहेत.
ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. निळी साडी, कानात झुमके या लूकमध्ये त्या खूप सुंदर दिसत आहेत. तर निळा शर्ट आणि जीन्स परिधान करुन अविनाश नारकर बायकोसोबत डान्स करत आहेत. नायक सिनेमातलं रुखी सुखी रोटी या गाजलेल्या गाण्यावर त्यांनी हे रील बनवलं आहे. या व्हिडिओला ऐश्वर्या यांनी 'माय नायक' असं कॅप्शन दिलं आहे. दोघंही डान्स एन्जॉय करताना दिसत आहेत.
व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचं लक्ष अविनाश नारकर यांच्या केसांकडे गेलं. त्यांनी केस डाय केल्याचं लोकांच्या लक्षात आलं. यावरुन युझर्सने त्यांची चांगलीच थट्टा केलीये. 'डाय केला सरांनी आणि ते आता संतूर पप्पा झाले...','ऐश्वर्या मॅडम अविनाश सरांना जुळा भाऊ आहे माहिती नव्हते एकाचे केस पांढरे आणि दुसर्याचे केस काळे' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत